शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नागपूर जिल्ह्यात पेट्रोलपंपावर दरोडा; २७ हजार रुपये पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 12:16 IST

मौदा तालुक्यातील वडोदा येथील पेट्रोलपंपवर सहा तरुणांनी दरोडा टाकून २७,४०० रुपये पळविले. दरोडेखोरांनी पेट्रोलपंपावरील तिघांना जबर मारहाणही केली. ही घटना मंगळवारी (दि. २२) मध्यरात्रीनंतर २.४० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देसुपरवायजरसह दोघांना मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मौदा तालुक्यातील वडोदा येथील पेट्रोलपंपवर सहा तरुणांनी दरोडा टाकून २७,४०० रुपये पळविले. दरोडेखोरांनी पेट्रोलपंपावरील तिघांना जबर मारहाणही केली. ही घटना मंगळवारी (दि. २२) मध्यरात्रीनंतर २.४० वाजताच्या सुमारास घडली. या दरोड्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.चंद्रशेखर हेमराज मेश्राम (२७, रा. वॉर्ड क्र. ५, वडोदा, ता. कामठी) असे फिर्यादीचे नाव आहे. तो एक दिवसाआड याप्रमाणे रिलिव्हर सुपरवायजर म्हणून वडोदा येथील रिलायन्सच्या पेट्रोलपंपवर काम करतो. मंगळवारी रात्री तो आणि त्याच्यासह शैलेंद्र मनीराम बोंबर्डे, मदन हरीणखेडे हे दोन सेल्समन पेट्रोलपंपवर कार्यरत होते. चंद्रशेखर मेश्राम हा सेल्समनकडील पेट्रोल - डिझेल विक्रीचे २१,४०० रुपये लॉकर रुमकडे घेऊन जात होता. तेवढ्यात पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी पेट्रोलपंपवर आली. त्यात सहाजण तोंडावर रुमाल बांधून आलेले होते. त्यातील पाच जणांनी काळसर जॅकेट घातलेले होते. ते थेट सुपरवायजर सेल्स रुममध्ये आले आणि शिवीगाळ करू लागले. तेवढ्यात सुपरवायजर हा नाईट शिफ्टमधील पैसे लॉकरमध्ये टाकत असताना एका आरोपीने सुपरवायजरच्या मांडीवर लोखंडी रॉडने मारले. त्याच्याशी धक्काबुक्की करीत त्याच्या हातातील २१,४०० रुपये हिसकावले. त्यानंतर सुपरवायजरसोबत असलेल्या शैलेंद्रच्या पायावर रॉड मारून त्याच्याकडून चार हजार रुपये तर मदनकडून दोन हजार असे २७ हजार रुपये घेऊन पसार झाले. विशेष म्हणजे त्यांच्या बोलेरो गाडीवर नंबर प्लेट नव्हती, असे फिर्यादी सुपरवायजर सांगत आहे.

दराडेखोर हिंदी भाषिकया प्रकरणी मौदा पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३९५, ३९७, ४५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मडामे करीत आहे. याच प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्या नेतृत्वातील पथक करीत आहे. आरोपींपैकी एक आरोपी हा मराठीत तर उर्वरित पाचजण हिंदीत संभाषण करीत होते, असेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. या प्रकरणात लवकरच आरोपींपर्यंत पोहोचू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

टॅग्स :Crimeगुन्हाPetrol Pumpपेट्रोल पंप