शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दररोज वाढताहेत पेट्रोलचे भाव : वाहनचालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 20:43 IST

‘अच्छे दिन’चे आश्वासन देणाऱ्या  मोदी सरकारच्या कार्यकाळात पेट्रोलचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. अनेक दिवसांपासून पेट्रोलचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे वाहनचालक हवालदिल झाले असून कर स्वरुपातील छुपा आर्थिक बोझा त्यांच्यावर पडत आहे. अखेर ‘अच्छे दिन’ केव्हा येणार, असा वाहनचालकांचा सवाल आहे.

ठळक मुद्दे‘अच्छे दिन’ केव्हा येणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘अच्छे दिन’चे आश्वासन देणाऱ्या  मोदी सरकारच्या कार्यकाळात पेट्रोलचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. अनेक दिवसांपासून पेट्रोलचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे वाहनचालक हवालदिल झाले असून कर स्वरुपातील छुपा आर्थिक बोझा त्यांच्यावर पडत आहे. अखेर ‘अच्छे दिन’ केव्हा येणार, असा वाहनचालकांचा सवाल आहे.पेट्रोल पंपचालक पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज बदलण्याच्या झंझटीमुळे त्रस्त झाले आहेत. बुधवारी पेट्रोलचे प्रति लिटर भाव ८१.७० रुपये आणि डिझेल ६८.८९ लिटर होते. गुरुवारी पेट्रोलमध्ये १ पैसा आणि डिझेलमध्ये केवळ ८ पैशांची घसरण झाली. त्यामुळे वाहनचालकांच्या खिशावर ताण पडला नाही. पण महिन्याभरात १ ते १५-२० पैसे दरररोज होणाºया भाववाढीमुळे पेट्रोल जवळपास २.५० रुपयांनी वधारले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका आणि उत्तर कोरियादरम्यान असलेल्या तणावामुळे पुढील काही दिवसांत पेट्रोलचे भाव प्रति लिटर १०० रुपयांवर जाऊ शकतात.विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव ठराविक किमतीवर पोहोचल्यानंतर पुन्हा खाली येत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात स्थानिक बाजारात पेट्रोलचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज बदलत असल्यामुळे पेट्रोल पंपचालक त्रस्त आहेत. दररोज सकाळी ५ वाजता पंपावर जाऊन मशीन आणि डिस्प्ले बोर्डावर भाव बदलावे लागतात. ही बाब अत्यंत आवश्यक आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोलnagpurनागपूर