शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पेट्रोल ७९.२२, तर डिझेल ७०.६० रुपये लिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 01:28 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने इंधनाच्या दरांमध्ये दरदिवशी वाढ होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कर कपातीची सर्वसामान्यांना अपेक्षा होती. पण पेट्रोल आणि डिझेलवर करवाढ केल्यामुळे आणि राज्याच्या व्हॅट आकारणीसह नागपुरात पेट्रोलचे प्रति लिटर दर २.५४ रुपये आणि डिझेल २.६२ रुपयांनी वाढले. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी पेट्रोल ७९.२२ रुपये आणि डिझेलची ७०.६० रुपये प्रति लिटर दराने विक्री झाली. दोन्ही इंधन महागल्यामुळे वाहनचालकांचा सरकारवर रोष आहे.

ठळक मुद्दे पेट्रोल २.५४, डिझेल २.६२ रुपयांनी महाग : माल वाहतुकीचे भाडे वाढणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने इंधनाच्या दरांमध्ये दरदिवशी वाढ होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कर कपातीची सर्वसामान्यांना अपेक्षा होती. पण पेट्रोल आणि डिझेलवर करवाढ केल्यामुळे आणि राज्याच्या व्हॅट आकारणीसह नागपुरात पेट्रोलचे प्रति लिटर दर २.५४ रुपये आणि डिझेल २.६२ रुपयांनी वाढले. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी पेट्रोल ७९.२२ रुपये आणि डिझेलची ७०.६० रुपये प्रति लिटर दराने विक्री झाली. दोन्ही इंधन महागल्यामुळे वाहनचालकांचा सरकारवर रोष आहे.अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर ८ वरून ९ टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. याशिवाय त्यावर सेस आकारला आहे. तसेच राज्य शासनातर्फे पेट्रोलवर २५ टक्के आणि डिझेलवर २१ टक्के व्हॅट आकारण्यात येतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेल कंपन्यांमध्ये पेट्रोलची उत्पादन किंमत ३७ ते ३८ रुपये प्रति लिटर आहे. त्यावर केंद्र आणि राज्यांचा विविध करांमुळे पेट्रोलचे दर दुपटीवर गेले आहेत. सरकारला जीएसटीच्या माध्यमातून दरमहा १ लाख कोटींपेक्षा जास्त महसूल मिळत असल्यामुळे पेट्रोल व डिझेलवर अधिभार लावण्याची काहीही गरज नव्हती. त्यामुळे मध्यमवर्गीय निराश आहे. अबकारी करात कपात करून दोन्ही इंधनाच्या किमती कमी करण्याची अनेक संघटनांची मागणी आहे. पण सरकार त्याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला.देशात पेट्रोलच्या तुलनेत डिझेलची विक्री तीनपट आहे. डिझेल महागल्यामुळे महागाई भडकणार आहे. देशांतर्गत घरगुती वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूकदारांची कर कमी करण्याची मागणी आहे. या संदर्भात वाहतूकदार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलInflationमहागाई