शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
3
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
4
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
5
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
6
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
7
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
8
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
9
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
10
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
11
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
12
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
13
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
14
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
15
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
17
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
18
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
19
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
20
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!

ईव्हीएम घोळावर हायकोर्टात याचिका

By admin | Updated: March 2, 2017 21:00 IST

ईव्हीएम घोळावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणूक नव्याने घेण्यात यावी

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 02 - ईव्हीएम घोळावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणूक नव्याने घेण्यात यावी व महापौरपदाच्या निवडणुकीवर स्थगिती देण्यात यावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. ही याचिका येत्या ९ मार्च रोजी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्या न्यायपीठासमक्ष सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.
राकेश मोहोड असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. महानगरपालिका निवडणुकीनंतर ‘ईव्हीएम’वरून विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरघोस यश मिळाले असून अन्य पक्षांना अपेक्षेनुसार आकडा गाठता आलेला नाही. काही उमेदवारांनी त्यांना हमखास म्हणता येतील अशीही मते मिळाली नसल्याचा दावा केला आहे. सर्वांचा रोष ‘ईव्हीएम’वर आहे. निवडणुकीत सदोष ‘ईव्हीएम’ वापरून मतांची पळवापळवी झाल्याचा आरोप केला जात आहे. निवडणुकीत प्रभागातील चार विभागांकरिता वेगवेगळ्या ‘ईव्हीएम’ ठेवण्यात आल्या नाहीत. एका विभागाचे उमेदवार संपल्यानंतर दुसºया विभागातील उमेदवारांची यादी ‘ईव्हीएम’वर लावण्यात आली होती. याद्यांचा रंग वेगवेगळा होता. असे असले तरी असंख्य मतदारांचा यामुळे गोंधळ उडाला. मतदान कसे करावे हेच त्यांना कळले नाही. अनेकांनी निवडणूक अधिकाºयांच्या मदतीने मतदान केले. आपण दिलेले मत आपल्याला हव्या त्याच उमेदवाराच्या खात्यात गेले हे समजायला काहीच मार्ग नव्हता. हा सर्व गोंधळ पाहता याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रोहण छाब्रा कामकाज पाहणार आहेत.
 
‘व्हीव्हीपॅट’ आवश्यक
सर्वोच्च न्यायालयाने सुब्रमण्यम स्वामी यांच्या प्रकरणावरील निर्णयात ‘ईव्हीएम’मध्ये ‘व्हीव्हीपॅट’(व्होटर व्हेरिफाईड पेपर आॅडिट ट्रेल) प्रणाली वापरण्याचा आदेश दिला आहे. परंतु, निवडणूक आयोगाने या आदेशावर अद्यापही अंमलबजावणी केली नाही. महानगरपालिका निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ‘ईव्हीएम’मध्ये ‘व्हीव्हीपॅट’ प्रणाली नव्हती. त्यामुळे मतदारांना त्यांनी टाकलेले मत संबंधित उमेदवाराच्याच खात्यात जमा झाले हे कळू शकले नाही. ‘व्हीव्हीपॅट’ प्रणाली असलेल्या ‘ईव्हीएम’मधून मतदाराला मतदान केल्यानंतर पावती मिळते. त्यातून आपण दिलेले मत योग्य उमेदवाराच्या खात्यात जमा झाले किंवा नाही हे कळते. ‘व्हीव्हीपॅट’ प्रणाली वापरण्यात आली नसल्यामुळे महानगरपालिका निवडूक अवैध ठरते. ही निवडणूक पारदर्शीपणे झाली असे म्हणता येणार नाही. परिणामी निवडणूक रद्द करणे आवश्यक आहे असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.