शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकांमुळे झालेल्या मृत्यूंवर हायकोर्टात याचिका, न्यायिक आयोगाद्वारे चौकशी करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 20:04 IST

दोषपूर्ण कीटकनाशकांनी गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक शेतक-यांचे बळी घेतले आहेत. या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

नागपूर : दोषपूर्ण कीटकनाशकांनी गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक शेतक-यांचे बळी घेतले आहेत. या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर उद्या, शुक्रवारी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासममक्ष सुनावणी होणार आहे. सद्या हा मुद्दा राज्यभर गाजत असून शासनावर जोरदार टीका होत आहे.सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी अ‍ॅड. ए. के. वाघमारे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. शेतक-यांच्या मृत्यूंची न्यायिक आयोग किंवा विशेष तपास पथकाद्वारे सखोल चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकारी व कंपन्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, मयत शेतक-यांच्या कुटुंबियांना २० लाख तर, प्रभावित शेतक-यांना १० लाख रुपये भरपाई देण्यात यावी, रुग्णालयात उपचारावर झालेला खर्च शेतक-यांना परत करण्यात यावा, दोषी अधिकारी, कंपन्या, वितरक व चिल्लर विक्रेत्यांवर भादंविच्या कलम ३०४-भाग-२ (सदोष मनुष्यवध) व ३०४-अ (निष्काळजीपणा) आणि कीटकनाशक कायद्यातील कलम २९ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात यावा.दोषी कीटकनाशक उत्पादक कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात यावी, बाजारातील दोषपूर्ण कीटकनाशकांचा साठा तत्काळ जप्त करून दुकाने सिल करण्यात यावीत आणि कीटकनाशक कायदा व नियमांची राज्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी अशी विनंती याचिकेद्वारे न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकेत मंत्रालयाचे प्रधान सचिव, कृषी विभागाचे सचिव, कृषी आयुक्त व यवतमाळ जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.