शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या पथसंचलनाविरुद्ध हायकोर्टात याचिका; काठ्या बाळगण्यावर आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 06:59 IST

दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर होणार सुनावणी

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने २०१८ साली करण्यात आलेल्या पथसंचलनामध्ये सहभागी स्वयंसेवकांनी पोलिसांची परवानगी नसताना हातात काठ्या बाळगल्या. त्याविरुद्ध मोहनीश जबलपुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास करण्याचे पोलीस  आयुक्तांना निर्देश देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी न्यायालयाला केली आहे.

२६ मे २०१८ रोजी पोलीस उपायुक्तांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला विशिष्ट अटींसह परवानगी दिली होती. अटींमध्ये कार्यक्रमात काठ्या, घातक शस्त्रे, ज्वलनशील पदार्थ व स्फोटके बाळगायची नाहीत, शस्त्रांचे प्रदर्शन करायचे नाही, आतषबाजी करायची नाही इत्यादींचा समावेश होता.  तसेच, अटींचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमातील प्रत्येक सदस्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. असे असताना संघाने २८ मे २०१८ रोजी सार्वजनिक रस्त्यांवर काठ्यांसह पथसंचलन केले. 

संघाची ही कृती समाजामध्ये दहशत पसरविणारी आहे. त्यामुळे दोषी व्यक्तींवर एफआयआर  नोंदविला जावा, असे जबलपुरे यांचे म्हणणे आहे. जबलपुरे यांनी यासंदर्भात सुरुवातीला २९ मे २०१८ रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. परिणामी त्यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. ती तक्रार १२ ऑक्टोबर २०१८ रोजी फेटाळण्यात आली.  त्या निर्णयाविरुद्ध त्यांनी सत्र न्यायालयात केलेला रिव्हिजन  अर्जही ६ मे २०१९ रोजी फेटाळण्यात आला. त्यामुळे त्यांनी आता  उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मोहन भागवत प्रतिवादीसदर याचिकेत सरसंघचालक मोहन भागवत, पथसंचलन व्यवस्था प्रमुख अनिल भोकारे, पोलीस आयुक्त, विशेष शाखा पोलीस उपायुक्त व कोतवाली पोलीस निरीक्षक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर दिवाळीच्या सुट्यानंतर सुनावणी होणार आहे

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत