शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणी पारदर्शीपणे होण्यासाठी नाना पटोलेंची हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 20:58 IST

लोकसभेच्या नागपूर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले व नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी मतमोजणी पारदर्शीपणे व्हावी आणि मतमोजणीदरम्यान नियमांचे काटेकोर पालन केले जावे याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर बुधवारी अवकाशकालीन न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला. निर्णय गुरुवारी सकाळी १०.३० वाजता घोषित केला जाईल.

ठळक मुद्देबुधवारी झाली सुनावणी : गुरुवारी सकाळी दिला जाईल निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या नागपूर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले व नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी मतमोजणी पारदर्शीपणे व्हावी आणि मतमोजणीदरम्यान नियमांचे काटेकोर पालन केले जावे याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर बुधवारी अवकाशकालीन न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला. निर्णय गुरुवारी सकाळी १०.३० वाजता घोषित केला जाईल.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वत:च्याच स्तरावर सहा खोल्यांमध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक खोलीमध्ये २० याप्रमाणे १२० टेबल्सवर मतमोजणी करण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय ३ टेबल्स पोस्टल बॅलेट मोजण्यासाठी तर, ६ टेबल्स सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाठी राहणार आहेत. असे असताना निवडणूक निर्णय अधिकाºयांनी पटोले यांच्या केवळ १२४ प्रतिनिधींना मतमोजणीच्या टेबल्सवर हजर राहण्याची परवानगी दिली आहे. सहा सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या टेबल्सवर एकाही प्रतिनिधीला मंजुरी देण्यात आली नाही. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी व भारतीय निवडणूक आयोगाला निवेदन सादर केले होते. परंतु, कुणीच लक्ष दिले नाही. परिणामी, मतमोजणीत गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रफिक अकबानी तर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे अ‍ॅड. निवेदिता मेहता यांनी कामकाज पाहिले.नियमांचे पालन झाले नाहीनिवडणूक नियमानुसार, मतमोजणीसाठी जास्तीतजास्त १४ टेबल्स लावता येतात. याव्यतिरिक्त एक टेबल निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा असतो. त्या सर्व ठिकाणी उमेदवार किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीला उपस्थित राहण्याची परवानगी देणे आवश्यक असते. टेबल्सची संख्या वाढवायची असल्यास भारतीय निवडणूक आयोगाची अनुमती घ्यावी लागते. परंतु, नागपूर मतदारसंघातील मतमोजणीसाठी टेबल्स निश्चित करताना या नियमाचे पालन झाले नाही असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNana Patoleनाना पटोले