शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणा अध्यक्षाविरुद्धचा अर्ज खारीज : नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 20:49 IST

हिंगणा नगर पंचायतच्या अध्यक्षा छाया भोसकर यांच्यासह दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यासाठी दाखल अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. सदस्यांमध्ये रेखा खापरे व वनिता नान्होरे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटप्रमुख गुणवंता चामाटे यांनी हा अर्ज दाखल केला होता.

ठळक मुद्देदोन सदस्यांनाही दिलासा

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर:हिंगणा नगर पंचायतच्या अध्यक्षा छाया भोसकर यांच्यासह दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यासाठी दाखल अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फे टाळून लावला आहे. सदस्यांमध्ये रेखा खापरे व वनिता नान्होरे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटप्रमुख गुणवंता चामाटे यांनी हा अर्ज दाखल केला होता.भोसकर, खापरे व नान्होरे यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम याअंतर्गत अपात्र ठरविण्यात यावे, असे चामाटे यांचे म्हणणे होते. सुनावणीच्या वेळी भोसकर यांचे वकील अ‍ॅड. महेश धात्रक यांनी अर्जावर तांत्रिक आक्षेप घेतला. अधिनियमानुसार, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांचाच स्थानिक प्राधिकरणात समावेश होतो. त्यात नगर पंचायतचा उल्लेख नाही. त्यामुळे हा अधिनियम नगर पंचायतला लागू होत नाही. परिणामी, भोसकर, खापरे व नान्होरे यांना अपात्र ठरवले जाऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी हा युक्तिवाद मान्य केला.चामाटे, भोसकर, खापरे व नान्होरे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. चामाटे यांनी गटप्रमुख या नात्याने भावना पुंड यांना अध्यक्षपदाकरिता प्रस्तावित केले होते. असे असताना भोसकर यांनी हिंगणा विकास आघाडी गटाकडून अध्यक्षपदासाठी अर्ज सादर केला. खापरे, नान्होरे व अन्य एका सदस्याच्या मतामुळे त्या विजयी झाल्या. तसेच, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांनी गटाचा आदेश पाळला नाही. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्याची विनंती अर्जात करण्यात आली होती.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय