शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

नागपूर विद्यापीठात ‘पेट-२’ होणार बंद; ‘पीएचडी’, ‘एमफिल’चे नियम बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 13:04 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘पीएचडी’, ‘एमफिल’ करणे सोपे होणार आहे. यासंबंधातील दिशानिर्देशांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपेशवे समितीने जुन्या दिशानिर्देशांमध्ये केले बदल

आशीष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘पीएचडी’, ‘एमफिल’ करणे सोपे होणार आहे. यासंबंधातील दिशानिर्देशांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. नियमांची समीक्षा करण्यासाठी बनविण्यात आलेल्या समितीने ‘पेट-२’ बंद करण्यासोबत अनेक शिफारशी केल्या आहेत. यासंबंधातील अहवाल लवकरच कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, जर नवीन नियम लागू झाले तर याचा फायदा पुढील शैक्षणिक सत्रात ‘पेट’मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना होईल. ‘पीएचडी’, ‘एमफिल’, ‘डीलिट’ व ‘डीएस्सी’च्या नियमांसंदर्भात विद्यापीठात बºयाच काळापासून वाद सुरू होता. त्यामुळे विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने डॉ.दिलीप पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली.समितीने ‘पीएचडी’, ‘एमफिल’, ‘डीलिट’ व ‘डीएस्सी’शी निगडित नियमांमध्ये बदल केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डायरेक्शन ३२ आॅफ २०१९’ च्या २९ पैकी १६ नियमांत बदल करण्यात आला आहे. काही आणखी नियमांना बदलण्याचे काम सुरू आहे.समितीच्या आतापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत. दोन बैठका आणखी होतील. या बैठकांमध्ये अहवालाला अंतिम रूप देण्यात येईल. विद्यापीठात संशोधनाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे संशोधन केंद्रांचीच संख्या वाढण्याची शक्यता आहे. ‘पेट-२’ कठीण असल्याने अनेक उमेदवार नोंदणीसाठी पात्र ठरण्यास अपयशी ठरले; शिवाय मार्गदर्शकांची समस्या आहेच. यामुळे अनेक विषयांत तर संशोधनच होत नसल्याचे चित्रआहे.

बदल होणे सोपे नाहीयासंबंधात विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी नियमांत बदल करणे सोपे नसल्याचे स्पष्ट केले. समिती जी शिफारस करेल ती लागू होईलच, असे नाही. समितीच्या अहवालाला अगोदर विद्वत परिषद व त्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी मिळणे आवश्यक ठरणार आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ