शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
4
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
5
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
6
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
7
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
8
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
9
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
10
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
11
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
12
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
13
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
14
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
15
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
16
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
17
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
18
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
19
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
20
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे टॉयलेटमधील व्हिडीओ शूट करणाऱ्या विकृत शिक्षकाचा भंडाफोड

By योगेश पांडे | Updated: February 1, 2025 08:18 IST

सिताबर्डीतील प्रकार : सजग नागरिकांमुळे प्रकार उघड, अगोदरदेखील आरोपीला झाली होती अटक.

योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला स्वच्छतागृहांमध्ये लपून महिलांचे व्हिडीओ शूट करणाऱ्या आरोपीचा भंडाफोड झाला आहे. संबंधित आरोपी हा एका शाळेत शिक्षक आहे. त्याने मागील वर्षीदेखील असाच प्रकार केला होता व त्याला संंबंधित शाळेतून काढण्यात आले होते. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मंगेश खापरे (३८, इतवारी) असे आरोपीचे नाव आहे. तो दिघोरी येथील एका शाळेत कलाशिक्षक आहे. शुक्रवारी विदर्भ साहित्य संघ संकुलात एक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेथे एक महिला स्वच्छतागृहात गेली असता मंगेशने खिडकीतून तिचा व्हिडीओ बनविला. महिलेला हालचाल जाणविल्यामुळे तिला हा प्रकार लक्षात आला. तिने आरडाओरड केल्याने नागरिकांनी मंगेशला रंगेहाथ पकडले. त्याचा मोबाईल तपासला असता त्यात अशा प्रकारचे महिलांचे स्वच्छतागृहातील ८ ते १० व्हिडीओ होते. सजग नागरिकांनी लगेच सिताबर्डी पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यांनादेखील धक्काच बसला. तो दिघोरीतील वैभवनगर येथील एका शाळेत शिक्षक आहे. त्याच्याविरोधात महिलेने तक्रार केली असून मध्यरात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

आरोपीला अगोदरदेखील झाली होती अटकआरोपी मंगेश खापरे याला २०२४ मध्येदेखील अटक झाली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या खासदार औद्योगिक महोत्सवादरम्यान स्वच्छतागृहात त्याने महिलांचे व्हिडीओ बनविले होते. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणी असा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली होती. त्याला प्रवेशद्वार सजविण्यासाठी बोलविण्यात आले होते व त्याने किळसवाणा प्रकार केला होता. त्याला त्यानंतर संबंधित शाळेतून काढण्यात आले होते. त्यानंतर तो दिघोरीतील शाळेत लागला होता.

२०२२ पासून सुरू आहे प्रकारमंगेशने पहिल्यांदाच असा प्रकार केलेला नाही. त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना अगोदरदेखील १८ ते २० मोबाईल क्लिपिंग्ज सापडल्या होत्या. त्यात २०२२ मधील मोबाईल क्लिपिंग्जचादेखील समावेश आहे.

टॅग्स :nagpurनागपूर