शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गुंडाचे अपहरण करून जंगलात केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 10:46 IST

नागपुरात शनिवारी दुपारी २ वाजता ही अपहरणाची घटना घडली. तर, ३० तास झाल्यानंतर अपहृत तरुणाचा मृतदेह आढळला.

ठळक मुद्दे३० तासांनी मिळाला मृतदेह प्रतिस्पर्धी गुंडांनी केला गेम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुंडांच्या एका टोळीने प्रतिस्पर्धी गुंडाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केली. शनिवारी दुपारी २ वाजता ही अपहरणाची घटना घडली. तर, ३० तास झाल्यानंतर अपहृत तरुणाचा मृतदेह आढळला. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.सनी दामोदर जांगीड (वय २०) असे अपहरण करून हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर हा गुन्हा करणाऱ्यापैकी प्रशील जाधव ऊर्फ मोनू रायडर आणि ललित रेवतकर या दोघांची नावे उघड झाली आहेत. तिसऱ्या आरोपीचे नाव अद्याप पुढे आले नाही. सनीची आई नंदा दामोदर जांगीड (वय ३९,रा. चंद्रनगर) यांनी शनिवारी दुपारी हुडकेश्वर ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सनी एका अंत्ययात्रेत गेला होता, नंतर तो परतच आला नाही. आरोपी मोनू आणि ललित या दोघांनी शनिवारी दुपारी २ च्या सुमारास सनीला फोन करून मानेवाड्यातील श्रीनगर क्रमांक-२ मध्ये बोलविले. सनी तेथे पोहचताच आरोपींनी त्याला जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवले. स्कुटीसारख्या दुचाकीवरील एका आरोपीने त्याला मागून पकडले तर दुसरा सनीच्या मांडीवर बसला. तिसऱ्या आरोपीने सुसाट वेगाने त्याला हुडकेश्वरमधील जंगलात नेले. त्यानंतर शस्त्राने घाव घालून निर्घृण हत्या केली.

हत्या करून फोन केलासनीची हत्या करून आरोपींनी त्याच्या भावाला फोन केला. सनीचा गेम केला असून हुडकेश्वरच्या जंगलामध्ये त्याला फेकले, अशी माहिती आरोपीने नातेवाईकाला दिली. आम्ही एक तासात घरी येतो असेही आरोपींनी नातेवाईकाला सांगितले. रविवारी दुपारी ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हुडकेश्वरच्या जंगलात शोधमोहिम सुरू केली. रात्री ७ च्या सुमारास सनीचा मृतदेह पोलिसांना मिळाला.

आरोपी आऊट ऑफ रेंजहा गुन्हा करणारे आरोपी मोनू, ललित रेवतकर आणि त्याचे साथीदार हे कुख्यात रामटेके टोळीचे गुंड आहेत. ते सराईत आहेत. सनीसुद्धा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. कुख्यात गुंड दबणे याचा तो भाचा होय. दबने सध्या तडीपार आहे. आरोपींचे सनीसोबत अनेक दिवसांपासून शीतयुद्ध सुरू होते. त्यातूनच त्यांनी सनीचा गेम केला. गुन्हा केल्यानंतर त्यांनी आपापले मोबाईल बंद करून टाकले. परिणामी, आरोपी कुठे आहेत, ते पोलिसांना कळेनासे झाले आहे. आरोपीच्या संपर्कातील १० ते १५ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आरोपींबाबत विचारपूस सुरू केली.

टॅग्स :Murderखून