शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारामुळे धारण गर्भ पाडण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:26 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी वैद्यकीय मंडळाचा अहवाल लक्षात घेता मानसिक आजारी व दिव्यांग असलेल्या १९ वर्षीय पीडित मुलीला बलात्कारामुळे धारण झालेला गर्भ पाडण्याची परवानगी दिली. गर्भ १९ आठवड्यांचा असून गर्भपात केल्यास मुलीच्या जीवाला धोका नसल्याचा अहवाल वैद्यकीय मंडळाने दिला आहे. हे प्रकरण बुलडाणा जिल्ह्यातील आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : पीडित मुलगी मानसिक आजारी व दिव्यांग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी वैद्यकीय मंडळाचा अहवाल लक्षात घेता मानसिक आजारी व दिव्यांग असलेल्या १९ वर्षीय पीडित मुलीला बलात्कारामुळे धारण झालेला गर्भ पाडण्याची परवानगी दिली. गर्भ १९ आठवड्यांचा असून गर्भपात केल्यास मुलीच्या जीवाला धोका नसल्याचा अहवाल वैद्यकीय मंडळाने दिला आहे. हे प्रकरण बुलडाणा जिल्ह्यातील आहे.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला. पीडित मुलगी चिखलीजवळच्या पळसखेड गावातील रहिवासी आहे. मुलीचे लग्न झाले असून पतीने तिला सहा महिन्यांपूर्वी सोडून दिले आहे. तिला आई व लहान भाऊ असून वडिलाचे निधन झाले आहे. आई शेतीची कामे करते. ती शेतात गेल्यानंतर मुलगी व तिचा भाऊ दोघेच घरी असतात. याचा फायदा घेऊन शेजारी राहणाऱ्या प्रभाकर सारंग गायकवाड या आरोपीने मुलीवर अत्याचार केला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. काही दिवसांपूर्वी मुलीची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता ती गर्भवती असल्याचे आढळून आले. आईने विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर मुलीवर बलात्कार झाल्याचे पुढे आले. स्थानिक सरकारी रुग्णालयांनी गर्भपात करण्यास नकार दिल्यामुळे मुलीच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने येत्या शनिवारी बुलडाणा जिल्हा शासकीय रुग्णालयात मुलीचा गर्भपात करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, मुलीला भरपाई देण्यास सांगितले आहे. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. स्विटी भाटिया तर, सरकारतर्फे अ‍ॅड. निवेदिता मेहता यांनी कामकाज पाहिले.बुलडाणा जिल्ह्यातील दुसरे प्रकरणबलात्कारामुळे धारण गर्भ पाडण्याची परवानगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात दाखल झालेले हे दुसरे प्रकरण होय. यापूर्वी एका घर कामगार महिलेने अशी याचिका केली होती. त्या महिलेच्या गर्भाची पूर्ण वाढ झाली होती. त्यामुळे न्यायालयाने तिला गर्भपाताची परवानगी देण्यास नकार दिला होता.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAbortionगर्भपात