शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या पतीने संबंध नाकारलेल्या पत्नीला गर्भपाताची परवानगी :उच्च न्यायालयाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 01:11 IST

High Court relief दुसऱ्या पतीने संबंध नाकारल्यामुळे मानसिक आघात झालेल्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गर्भपात करण्याची परवानगी दिली. न्यायालयाने हा निर्णय देताना मेडिकल बोर्डचे मत विचारात घेतले.

ठळक मुद्देमेडिकल बोर्डचे मत विचारात घेतले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दुसऱ्या पतीने संबंध नाकारल्यामुळे मानसिक आघात झालेल्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गर्भपात करण्याची परवानगी दिली. न्यायालयाने हा निर्णय देताना मेडिकल बोर्डचे मत विचारात घेतले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संबंधित महिलेने ती १५ आठवड्यांची गर्भवती असताना उच्च न्यायालयात याचिका दाखल करून गर्भपात करण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून मेडिकल बोर्ड स्थापन करण्यात आले. त्या बोर्डने महिलेच्या आवश्यक वैद्यकीय तपासण्या करून ३० एप्रिल रोजी न्यायालयात अहवाल सादर केला व रुग्णाच्या हिताकरिता गर्भपात करणे आवश्यक असल्याचे मत दिले. हा निर्णय येतपर्यंत महिलेचा गर्भ १६ आठवडे २ दिवसांचा झाला होता.

प्रकरणातील माहितीनुसार, संबंधित महिला सविता (काल्पनिक नाव) हिचे २०१५ मध्ये पहिले लग्न झाले होते. पहिला पती चांगला वागत नसल्यामुळे तिने घटस्फोटाकरिता कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ती याचिका प्रलंबित आहे. २०१९ मध्ये सविताची नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या पतीची ओळख झाली. दरम्यान, दुसऱ्या पतीने सविताला बेशुद्धीचे औषध देऊन तिची आक्षेपार्ह छायाचित्रे घेतली व तिच्यावर बळजबरी केली. तसेच, तो सविताला गप्प ठेवण्यासाठी आक्षेपार्ह छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्यानंतर दुसऱ्या पतीने स्वत:च २३ जुलै २०२० रोजी आर्य समाज येथे सवितासोबत लग्न केले. जानेवारी-२०२१ मध्ये सविताला गर्भधारणा झाली. तिने दुसऱ्या पतीला याची माहिती दिल्यानंतर त्याने सवितासोबतचे सर्व संबंध नाकारले, तसेच तो आधीच विवाहित असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत बाळाला जन्म देणे मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरेल, ही बाब लक्षात घेता तिने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सवितातर्फे अ‍ॅड. स्विटी भाटिया यांनी कामकाज पाहिले.

पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली

सविताने १७ मार्च २०२१ रोजी दुसऱ्या पतीविरुद्ध राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. त्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAbortionगर्भपात