शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जनाधार नसलेल्या नेत्यांना सक्तीची निवृत्ती द्या!

By admin | Updated: March 7, 2017 01:46 IST

मी कुठल्याही गटाचा नाही. परंतु गटातटाच्या राजकारणात नागपूर शहरातील काँग्रेस उद्ध्वस्त झाली आहे. यामुळेच महापालिका निवडणुकीत भाजपाला यश मिळाले.

प्रफुल्ल गुडधे यांचा बॉम्बगोळा   शहर काँग्रेसला चेहरा कुठाय ?  विरोधी पक्षनेत्यांची निवड दबावातून नागपूर : मी कुठल्याही गटाचा नाही. परंतु गटातटाच्या राजकारणात नागपूर शहरातील काँग्रेस उद्ध्वस्त झाली आहे. यामुळेच महापालिका निवडणुकीत भाजपाला यश मिळाले. काँग्रेसला चांगले दिवस येण्यासाठी जनाधार नसलेल्या नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी काँग्रेसमधून सक्तीची निवृत्ती द्यावी, अशी मागणी करीत ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी काँग्रेसला घरचा अहेर दिला आहे. विरोधी पक्षनेतेपदाची संधी नाकारल्याने नाराज असलेल्या प्रफुल्ल गुडधे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत काँग्रेसमधील गटबाजीवर घणाघाती टीका केली. विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने पाठविलेल्या निरीक्षकांनी पक्षाच्या नगरसेवकांची मते जाणून घेतली. यातील २७ नगरसेवकांनी माझ्या नावाला पाठिंबा दर्शविला. गार्गी चोपरा यांना घरी भेटायला गेलो असता, त्यांनीही मला पाठिंबा दर्शविला. परंतु शहरात जनाधार गमावलेल्या नेत्यांनी मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यामुळेच मला सभागृहाचा विरोधी पक्षनेता बनता आले नाही. पण शहरातील ३० लाख लोकांचा विरोधी पक्षनेता म्हणून मी जबाबदारी स्वीकारली असल्याचे गुडधे म्हणाले.महापौर, उपमहापौर व सत्तापक्ष नेत्यांची निवड झाली. पण शहरात चर्चा होती विरोधी पक्षनेता कोण होणार याचीच. या पदासाठी मी दावेदार असल्याचे वृत्त प्रकाशित झाले तसेच प्रत्यक्ष राजकारणात नसलेल्या लोकांचेही मला समर्थनासाठी फोन येत होते. त्या आधारावर माझा दावा प्रबळ होता, मात्र मला संधी मिळू दिली नाही. त्यामुळे पक्षपातळीवर घेण्यात आलेला निर्णय लोकांना आवडलेला नाही, असे मत त्यांनी मांडले.महापालिकेत भाजपला मिळालेले यश व शहराचे व्यापक हित विचारात घेता, विरोधी पक्षनेत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. काँग्रेसला संधी आहे. परंतु लोकांना विश्वासू चेहरा हवा आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रभागात याचा प्रत्यय आला. विश्वासू चेहरा मिळाल्याने लोकांनी काँग्रेसचे बंटी शेळके यांना निवडून दिल्याचे गुडधे म्हणाले. (प्रतिनिधी)प्रदेश काँग्रेसवर दबाव काँग्रेसकडे विश्वासू चेहरा नसल्याने महापालिका निवडणुकीत भाजपाला विजय मिळाला. मतदारांनी काँग्रेसवर विरोधी पक्षाची जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज होती. परंतु प्रदेश काँग्रेसवर राजकीय दबाव आणून विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय घ्यायला भाग पाडले. काँग्रेसमधीलच काही लोक काँग्रेसला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गुडधे यांनी केला.काही लोक काँग्रेसला खासगी मालमत्ता समजतातशहर काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहणे म्हणजे कार्यकर्ता, अनुपस्थित असणारे कार्यकर्ता नाही. विकास ठाकरे हेही शहर काँग्रेसचे अध्यक्ष होण्यापूर्वी अनुपस्थित राहात होते. त्यामुळे मी पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहत असल्याचा आरोप चुकीचा आहे. काही लोक काँग्रेसला खासगी मालमत्ता समजत असल्याचा आरोप गुडधे यांनी प्रश्नाच्या उत्तरात केला.महापालिकेत भ्रष्टाचार; उपलोकायुक्त हवाचनवनिर्वाचित महापौरांनी महापालिकेच्या पारदर्शी व स्वच्छ कारभाराचा दावा केला आहे. परंतु मुंबईप्रमाणे नागपूर महापालिकेत गेल्या दहा वर्षांत अनेक घोटाळे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापौर असतानाही घोटाळे झाले. महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर दरमहा ८० लाख ३८ हजार ३६८ रुपये खर्च केला जातो. प्रत्यक्षात सुरक्षा रक्षकांना ४८ लाख ३३ हजारांचे वेतन दिले जाते. दरमहा ३२ लाखांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप प्रफुल्ल गुडधे यांनी केला. महापालिकेच्या अनेक विभागात भ्रष्टाचार असल्याने मुंबईच्या धर्तीवर नागपुरातही उपलोकायुक्तांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.