शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी शस्त्रास्त्र बाळगण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 23:43 IST

देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ जाहीर झाली असून नागपूर शहरात ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ही निवडणूक नि:पक्ष, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक कालावधीत शस्त्रे अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जीवित हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी शस्त्रास्त्र, हत्यारे, दारुगोळा याचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्यामुळे असे शस्त्रास्त्र सार्वजनिक ठिकाणी जवळ बाळगण्यास, धारण करण्यास तसेच वाहून नेण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (अ) अन्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगण्यावर बंदी घालण्यात आली असल्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी कळविले आहे.

ठळक मुद्देसह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ जाहीर झाली असून नागपूर शहरात ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ही निवडणूक नि:पक्ष, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक कालावधीत शस्त्रे अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जीवित हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी शस्त्रास्त्र, हत्यारे, दारुगोळा याचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्यामुळे असे शस्त्रास्त्र सार्वजनिक ठिकाणी जवळ बाळगण्यास, धारण करण्यास तसेच वाहून नेण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (अ) अन्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगण्यावर बंदी घालण्यात आली असल्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी कळविले आहे.या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांच्याकडील सुरक्षा रक्षकाकडून निवडणूक कालावधीमध्ये त्यांच्याकडील शस्त्रांचा/हत्यारांचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित बँक, संस्थेच्या अधिकाऱ्यावर राहील, असेही सह पोलीस आयुक्तांनी कळविले आहे.हा मनाई आदेश ज्या समाजास त्यांच्या दीर्घकालीन स्थाई कायदा रुढी व परंपरा यानुसार शस्त्र बाळगण्याचा अधिकार आहे त्या समाजाला लागू असणार नाही. अशा समाजातील व्यक्तीचा हिंसाचारात सहभाग आढळून आल्यास आणि कायदा व सुव्यवस्थेस बाधा आल्यास, निवडणूक शांततेच्या मार्गाने पार पडण्यास अडथळा निर्माण झाल्यास अशा व्यक्तींची शस्त्रास्त्र अडकवून ठेवण्याचा प्रशासनास अधिकार राहील. हा आदेश २७ मे २०१९ पर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये करावाईस पात्र ठरतील, असेही सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpolice commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय