शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

‘प्रीमॅच्युअर बेबीज्’चे प्रमाण २३.६ टक्के

By admin | Updated: November 17, 2014 00:56 IST

पुरेसा आहार व विश्रांती न घेतल्याने, हायपरटेन्शन, गर्भारपणात पथ्य न पाळता प्रतिकूल आहार घेणे, उशिरा उठणे व उशिरा झोपणे, लेटनाईट पार्ट्यांना जाणे, धूम्रपान, मद्यपान यांचा अतिरेक करणे,

बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतेय प्रमाण : आज जागतिक ‘प्रीमॅच्युअर डे’नागपूर : पुरेसा आहार व विश्रांती न घेतल्याने, हायपरटेन्शन, गर्भारपणात पथ्य न पाळता प्रतिकूल आहार घेणे, उशिरा उठणे व उशिरा झोपणे, लेटनाईट पार्ट्यांना जाणे, धूम्रपान, मद्यपान यांचा अतिरेक करणे, गर्भाशयात गुंतागुंत निर्माण होणे, वय उलटून गेल्यानंतर लग्न व त्यानंतर प्रसूती अशी परिस्थिती वाढत असल्याने अपुऱ्या दिवसांचे अर्भक (प्रीमॅच्युअर बेबीज्) जन्माला येण्याचे प्रमाण वाढले आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी चार ते पाच टक्के केसेसमध्ये प्रीमॅच्युअर बेबीज् जन्माला येत होत्या. आता भारतात ते प्रमाण २३.६ टक्क्यांपर्यंत गेले असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. जगात हे प्रमाण ५९ टक्के आहे.प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्यामागे असणाऱ्या अगणित कारणांमध्ये मातेचे वय हादेखील महत्त्वाचा घटक आहे. प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेश अग्रवाल यांनी सांगितले, बाळाला जन्म देण्यासाठी १८ ते ३५ हा वयोगट आदर्श मानला जातो. या गटाच्या आत-बाहेर वय असेल म्हणजे १८ पेक्षा कमी किंवा ३५ पेक्षा अधिक वय असेल तर अशा डिलिव्हरीमध्ये गुंतागुंत होऊ शकते. अपुऱ्या दिवसाचे बाळ जन्माला येऊ शकते. आईचे वजन व उंची हे घटकही महत्त्वाचे असतात. वय व उंचीबरोबरच मातेचे बीएमआय अर्थात बॉडी मास इंडेक्सही यात महत्त्वाची भूमिका पार पाडते. मातेची हाडे कितपत मजबूत आहेत यावर बाळाची वाढ अवलंबून असते. ज्या मातांच्या आहारात जीवनसत्त्वे व प्रथिनांचा अभाव असतो, ज्यांना केवळ जंक फूडचीच आवड असते अशा महिलांची बाळे मुदतीच्या आधी जन्माला येण्याची शक्यता अधिक असते. स्थूलता जरी प्रत्यक्षपणे प्रीमॅच्युर डिलिव्हरीला कारणीभूत ठरत नसली तरी त्यामुळे हायरपरटेन्शन व मधुमेहाची शक्यता वाढवू शकते. ज्यांचे पहिले बाळंतपण वेळेच्या आधी झाले असेल त्यांचे दुसरे बाळंतपणही असेच होण्याची शक्यता असते. याशिवाय आययुआय, आयव्हीएफ अर्थात टेस्टट्यूब बेबी या ट्रीटमेंटद्वारे गर्भारपण असेल तर अशा केसेमध्येही प्रीमॅच्युअर डिलिव्हरीजची शक्यता असते. तसेच थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांना या डिलिव्हरीजचा धोका अधिक असतो. यातील तीन ते पाच टक्के महिलांना त्याचा त्रास होतो.(प्रतिनिधी)