कळमेश्वर/कामठी/हिंगणा/काटोल/उमरेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यात करण्यात आलेल्या २८४१ चाचण्यापैकी ३३ (१.१६ टक्के) नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागात मंगळवारी १६२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ५७६ वर आली आहे.
ग्रामीण भागात आतापर्यंत १,४२,५०४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १,३९,२२५ नागरिक कोरोनामुक्त झाले, तर २२९९ रुग्णांचा मृत्यू झाला. कामठी तालुक्यात १३६ नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. तीत नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कळमेश्वर तालुक्यात चार रुग्णांची नोंद झाली. यात बुधला येथे २, तर मोहपा व घोराड येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात ३३२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात डिगडोह येथील ४ , कान्होलीबारा, वानाडोंगरी येथील प्रत्येकी २, तर टाकळघाट व देवळी सावंगी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. उमरेड ग्रामीणमध्ये एका रुग्णाची नोंद झाली. काटोल तालुक्यात १३० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत काटोल शहरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. काटोल ग्रामीणमध्ये एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.