‘आयआयएम-नागपूर’मधील फ्रेशर्स’ची टक्केवारी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:12 AM2018-10-31T11:12:27+5:302018-10-31T11:14:57+5:30

महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’मध्ये ‘आयआयएम’मध्ये प्रवेश घेणाऱ्या ‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असले तरी टक्केवारीत वाढ झाली आहे.

The percentage of freshers in 'IIM-Nagpur' increased | ‘आयआयएम-नागपूर’मधील फ्रेशर्स’ची टक्केवारी वाढली

‘आयआयएम-नागपूर’मधील फ्रेशर्स’ची टक्केवारी वाढली

Next
ठळक मुद्देनोकरीतून शिक्षणाकडे परत वळलेल्या अभियंत्यांचे प्रमाण मात्र अधिकच वाणिज्य शाखेतील केवळ ६ टक्के विद्यार्थी

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’मध्ये पहिल्या तीन ‘बॅच’मध्ये सर्व जागा भरल्या गेल्या नव्हत्या. ‘प्लेसमेंट’चा टक्का वाढल्याने यंदा तरी सर्व जागांवर प्रवेश होतील, असा अंदाज होता. मात्र यंदादेखील पूर्ण जागांवर प्रवेश होऊ शकला नाही. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदादेखील ‘आयआयएम’मध्ये प्रवेश घेणाऱ्या ‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांचे प्रमाण उद्योगक्षेत्राचा अनुभव असलेल्यांच्या तुलनेत कमी असले तरी मागील तीन वर्षांच्या तुलनेत टक्केवारीत वाढ झाली आहे.
यातही ‘आयआयएम-नागपूर’च्या या ‘बॅच’मधील बहुतांश विद्यार्थी कुठे ना कुठे कार्यरत राहून चुकले आहे. यंदाच्या ‘बॅच’मधील ‘फ्रेशर्स’ विद्यार्थ्यांची टक्केवारी ११ टक्के इतकी आहे. ८९ टक्के विद्यार्थ्यांना ३ वर्षांपर्यंतच्या कामाचा अनुभव आहे. विद्यार्थ्यांचा उद्योगक्षेत्रात कामाचा सरासरी अनुभव हा ३० महिने इतका आहे तर विद्यार्थ्यांचे सरासरी वय हे २५ वर्षे इतके आहे.

यंदाही पूर्ण प्रवेश नाहीत
देशातील अग्रणी व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे संस्थेचे पालकत्व देण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या येथे उड्या पडतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात एकाही वर्षी येथील पूर्ण जागांवर प्रवेश झाले नाहीत. पहिल्या वर्षी ‘पीजीपी’ (पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेंट) या अभ्यासक्रमात ६० पैकी ५३ प्रवेश झाले होते तर दुसºया वर्षी हीच संख्या ५४ इतकी होती. मागील वर्षी ५७ प्रवेश होते. यंदा ‘आयआयएम’च्या जागांमध्ये दुपटीने वाढ झाली. मात्र १२० पैकी यंदा १११ जागांवरच प्रवेश झाले. मागील तीन वर्षांत ‘आयआयएम-नागपूर’ने शिक्षणाचा दर्जा वाढविण्यावर भर दिला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे २०१७-१८ मध्ये तर १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले. मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी ‘पॅकेज’मध्ये १४ टक्क्यांची वाढ दिसून आली. येथील पूर्ण जागा न भरल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘आयटी’ क्षेत्रातील ५२ टक्के विद्यार्थी
‘आयआयएम-नागपूर’च्या पहिल्या ‘बॅच’मध्ये ‘आयटी’ क्षेत्रातील अभियंत्यांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक होते. दुसºया ‘बॅच’मध्ये ५७.१४ टक्के ‘आयटी’ अभियांत्रिकी क्षेत्रातील होते. मागील वर्षी हेच प्रमाण अवघे २ टक्के होते. तर यंदाच्या ‘बॅच’मधील ५२ टक्के विद्यार्थी हे ‘आयटी’ शाखेतील आहेत.

Web Title: The percentage of freshers in 'IIM-Nagpur' increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.