शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

लोक फुटतात-तुटतात, पण तिची साथ ११ हजार वर्षांपासून! जागतिक चिमणी दिवस, सर्वात प्रबळ प्रजाती

By निशांत वानखेडे | Updated: March 20, 2024 13:40 IST

माणूस समूहाने शेती करायला लागला, तेव्हापासून चिऊताईची त्याला सोबत आहे, असे संशाेधकांचे मत आहे.

निशांत वानखेडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मानवाच्या सर्वांत जवळची प्रजाती म्हणून श्वानाव्यतिरिक्त चिमणीची गणना केली जाते. अंटार्टिक वगळता जिथे-जिथे मानवी  अस्तित्व आहे, तिथे चिमणीचे वास्तव्य आहे. अगदी ११,००० वर्षांपूर्वीपासून हा चिमुकला जीव माणसांच्या साेबत असल्याचे पुरावे संशाेधनातून पुढे आले आहेत. म्हणजे माणूस समूहाने शेती करायला लागला, तेव्हापासून चिऊताईची त्याला सोबत आहे, असे संशाेधकांचे मत आहे.

१७व्या शतकात चीनमध्ये व १९व्या शतकात इंग्लंड व युराेपीय देशात चिमण्यांची संख्या ६० ते ७० टक्के घटल्याचे आढळले. काही दशकांत भारतामध्येही संख्या कमी झाली आहे, असे असले तरी ही प्रजाती पक्ष्यांमध्ये सर्वांत प्रबळ असल्याचे म्हटले जाते. कारण सर्वांत हुशार माणसांसाेबत राहणे इतर पक्ष्यांना जमले नाही, ते चिमणीने करून दाखविले.

मानवी परिवर्तनाशी थेट संबंध

राॅयल साेसायटी लंडनचे २०१८चे नवे संशाेधन, तसेच नार्वे, इराण, कझाकिस्तानच्या संशाेधकांनी जिनाेम सिक्वेन्सिंगच्या आधारे ११ हजार वर्षांपूर्वी माणूस शेती करायला लागला, तेव्हापासून चिमणी त्याच्यासाेबत असल्याचे स्पष्ट केले आहे.बेथलहेममधील गुहेतील जीवाश्म पुराव्याच्या आधारे ४ लाख वर्षांपूर्वी चिमणीचे अस्तित्व माणसांसाेबत हाेते, असेही स्पष्ट केले आहे. 

बोगनवेल हे चिऊताईचे नवे घर!

पुणे : शहरीकरणामुळे चिमण्या कमी झाल्याची ओरड होते. मात्र, चिमण्या कमी झाल्या नसून अधिवास कमी झाला आहे. त्या आता बोगनवेलींचा शोध घेऊन त्यामध्ये आपले घर थाटताना दिसत आहेत, असे निरीक्षण ज्येष्ठ जैवविविधता संशोधक डॉ. हेमंत घाटे यांनी नोंदविले. बोगनवेल असेल तिथे चिमण्या भरपूर पाहायला मिळतात. सर्वत्र सिमेंटच्या इमारतींमुळे चिमण्यांना जागाच राहिली नाही; पण चिमण्यांनी आता नवीन बदलामुळे स्वत:ला राहण्यासाठी सामावून घेतले आहे, असे ते सांगतात.

का घटतेय संख्या?

  • टेलिकाॅम टाॅवरच्या रेडिएशनमुळे चिमण्यांच्या प्रजननावर विपरीत परिणाम हाेतो, असे संशोधन आहे. 
  • जुन्या इमारती, वाडे, घरे नाहीशी झाली. 
  • काही दशकांत अन्नासाठी चिमणीसाेबत भाेवरी, मैना, पारवा या पक्ष्यांची स्पर्धा वाढली असून ते प्रबळ ठरत आहेत.
  • माेठी शहरे साेडून चिमण्यांनी मुक्काम लहान शहर किंवा गावांकडे वळविला आहे.
टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र