निवृत्तीवेतन ७ डिसेंबरला होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:11 AM2020-12-05T04:11:14+5:302020-12-05T04:11:14+5:30

--------------------- दहावी व बारावी परीक्षेबाबत निवेदन नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या ...

The pension will be paid on December 7 | निवृत्तीवेतन ७ डिसेंबरला होणार

निवृत्तीवेतन ७ डिसेंबरला होणार

Next

---------------------

दहावी व बारावी परीक्षेबाबत निवेदन

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षांसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र संबंधित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पध्दतीने भरुन घेण्यात येतात. आवेदन पत्रामध्ये विविध माहितीचा समावेश आहे. त्यामध्ये मायनोरिटी रिलीजन हा रकाना २०१४ पासून समाविष्ट करण्यात आलेला आहे. रकान्यात मुस्लीम, ख्रिश्चन, बुद्ध, शीख, पारसी व जैन या मायनोरिटी रिलीजनच्या उपरकान्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती मंडळाच्या परीक्षा फॉर्ममध्ये शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरुन घेण्यात येत आहे. मंडळाच्या परीक्षा समितीच्या ठरावांतर्गत उपरकान्यांचा समावेश फॉर्ममध्ये करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांना रकान्यातील माहिती भरण्यासाठी नॉन मॉयनारिटी हा रकाना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ही माहिती विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रावर नमूद करण्यात येत नाही, असे सचिव राज्य मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.

00000

Web Title: The pension will be paid on December 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.