शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

पेंच, कहांडलाची सफारी ५०० ते ७०० ने वाढली तरीही पर्यटकांची गर्दी

By निशांत वानखेडे | Updated: December 9, 2024 15:12 IST

Nagpur : वन परवानगी शुल्कात मोठी वाढ, पर्यटकांच्या संख्येत मात्र घट नाही

निशांत वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वाघांची राजधानी म्हणून नागपूरचा उल्लेख होतो व सेलिब्रिटींपासून जगभरातले पर्यटक पर्यटनासाठी दरवर्षी येथे येत असतात. ताडोबा, पेंच, उमरेड कन्हांडला व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांचे लोंढे वाढत आहेत. मात्र, येथील जंगल सफारी आता सामान्य पर्यटकांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. पावसाळ्यानंतर पर्यटन सुरू होताच सफारीचे दर ५०० ते ७०० रुपयापर्यंत वाढले आहेत, एवढेच नाही तर निवास खर्चातही मोठी वाढ झाली आहे.

नागरिकांसाठी जंगल सफारी आता आवडीचा विषय झाला आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी जंगल सफारीला प्राधान्य दिले जाते. मात्र, ही सफारी आता सामान्यांच्या अवाक्याबाहेर जात आहे. पावसाळ्यानंतर सफारी सुरू होताच दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जिल्ह्यात पेंच व्याघ्र प्रकल्प हे सफारीचे सर्वात मोठे स्थळ मानले जाते, येथे ६ पर्यटकांच्या जिप्सीची सफारी ५०२५ रुपयांवरून ५५२५ रुपये झाली आहे. त्यानुसार मोठ्या कॅन्टरचे दरही ७०० रुपयापर्यंत वाढले आहेत. शिवाय वनविभागाच्या पर्यटक निवासाचे दरही २०० ते ४०० रुपयांनी वाढले आहे. पेंचच्या सुरेवानी, कोलितमारा, सिल्लारी व चोरवाहुली येथे असलेल्या एका रेस्ट रूमचे दर २२०० रुपये होते, जे २४०० रुपये अधिक १२ टक्के जीएसटी असे वाढले आहेत. खाजगी रिसॉर्टचे दर तर प्रतिव्यक्ती ३००० रुपयांपर्यंत वाढले आहेत. 

शनिवार, रविवारचे दर वेगळे

  • उमरेड कहांडला अभयारण्याचे दरही वाढले आहेत. २५० वर्गकिमीमध्ये पसरलेल्या या अभयारण्यात १० ते १२ वाघ आहेत. लहान जंगल क्षेत्र असल्याने येथे सहज वाघाचे दर्शन होते. 
  • पावसाळ्यापूर्वी ६ लोकांच्या सफारीचे ३८२५ रुपये होते, ज्यामध्ये वन परवानगी ८५० रुपये, जिप्सी २५०० आणि गाईडचे ४७५ रुपये अंतर्भूत होते. 
  • आता मात्र सफारी ४४७५ रुपयांवर गेली आहे. यात जिप्सी व गाईडचे दर सारखेच आहेत पण वन परवानगीचे शुल्क ६५० रुपयांनी वाढून १५०० रुपये करण्यात आले आहेत. २०० ते ४०० रुपये कॅमेरा शुल्क वेगळा द्यावा लागतो आहे. 
  • शनिवारी आणि रविवारी तर सफारीचे दर ४९७५ रुपये घेतले जातात, ज्यात वन परवानगी शुल्क २००० रुपये करण्यात आले आहे.

तरीही ख्रिसमस, न्यू इयर फुल्ल सफारी महागली असली तरी पर्यटनात कमतरता आली नाही. ख्रिसमसच्या सुट्ट्या व नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी जंगल सफारीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे २० डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत पेंच व उमरेड कहांडलाची सफारी फुल्ल झाली आहे. पर्यटक तिकीट मिळण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन, असे दोन्ही प्रयत्न करूनही बुकिंग मिळेना झाली आहे. त्यामुळे आता प्लॅनिंग केले, तरी ५ जानेवारीनंतरचीच बुकिंग मिळेल, अशी स्थिती आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवTigerवाघnagpurनागपूर