शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

तीन वर्षाच्या थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 20:36 IST

Penalty on property tax waived कोरोना महामारीमुळे आर्थिक संकट ओढवले. अनेकजण मालमत्ता कर भरू शकले नाही. संकटातील नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून वर्ष २०१८-१९, २०१९-२० आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षातील थकीत मालमत्ता कराच्या रकमेवरील व्याजाची (शास्ती) रक्कम माफ करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमनपाची पुन्हा अभय योजना : सभागृहात घोषणा : आयुक्त निर्णय घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना महामारीमुळे आर्थिक संकट ओढवले. अनेकजण मालमत्ता कर भरू शकले नाही. संकटातील नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून वर्ष २०१८-१९, २०१९-२० आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षातील थकीत मालमत्ता कराच्या रकमेवरील व्याजाची (शास्ती) रक्कम माफ करण्यात येणार आहे. तीन वर्षातील थकबाकी सरसकट एकमुस्त भरली तरच या अभय योजनेचा लाभ थकबाकीदारांना मिळणार आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यावर निर्णय घेतल्यानंतर याचा लाभ थकबाकीदारांना मिळणार आहे.

काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याचा मुद्दा नोटीसव्दारे उपस्थित केला. कोरोना संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. पहिल्या लाटेत लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांचा रोजगार गेला. अनेकांचा पगार निम्मा झाला तर अनेकांचे उत्पन्न घटले. यातून सावरत नाही. तोच दुसरी लाट आली. याच नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला. नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. याचा विचार करता मागील तीन वर्षातील मालमत्ता करावरील शास्ती माफ करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी गुडधे यांनी केली. कायद्यातील तरतुदीनुसार मालमत्ताधारकांना डिमांड पाठविली तरच शास्ती लावता येते. याचा आधार घेऊन सभागृहात शास्ती माफीचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे यांनी मांडली.

त्यावर महापौर दयाशंकर तिवारी यांनी महिन्याभरात ही रक्कम थकबाकीदारांनी जमा करण्यावर संमती दर्शविली. परंतु, महिन्याभरात या सर्वसामांन्यांकडे एवढे पैसे येणार कसे? असे सांगत गुडधे यांनी या तीन वर्षाची संपूर्ण व्याजाची रक्कम सरसकट माफ करण्याची विनंती लावून धरली. महापौरांनी थकबाकीदारांनी दोन महिन्यात रक्कम भरावी असे स्पष्ट केले.

अशी आहे थकबाकी (कोटी)

वर्ष            थकबाकी     चालू डिमांड            एकूण

२०१९     ३२०.३६             १८५.६४           ५०९.००

२०२०    ५१४.७९             २३३.९८           ७४८.७६

२०२१   ६८०.३२             २६१.६०            ९४१.९२

शास्ती माफीचा अधिकार आयुक्तांना

थकबाकीवरील शास्ती माफीचा मनपा आयुक्तांना स्वेच्छाधिकार आहे. यामुळे महापालिका सभागृहात शास्ती माफीचा निर्णय घेतला असला तरी या संदर्भात आयुक्तांनी निर्णय घेतल्यानंतरच याचा लाभ थकबाकीदारांना होणार आहे. विशेष म्हणजे आयुक्तांनी १५ डिसेंबर २०२० ते १४ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ‘अभय योजना -२०२०’ राबविण्याचा निर्णय घेतला होता. सभागृहाच्या निर्णयानुसार नियोजन करून आयुक्त निर्णय घेतील.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर