शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

बिलाचा ‘चेक बाऊन्स’ झाल्यास १५०० रुपयांचा दंड; महावितरणचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 11:35 IST

वीज बिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआजपासून आदेशाची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज बिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे. महावितरणने वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकताच हा आदेश दिला आहे. गेल्या १ नोव्हेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.महावितरणच्या १६ परिमंडळातील सुमारे ५ लाख ८२ हजार लघुदाब वीज ग्राहक हे धनादेशाद्वारे दरमहा सुमारे ५४२ कोटी रुपयांच्या वीज बिलांचा भरणा करतात. परंतु यातील सुमारे १० हजार रुपयांच्या धनादेशाचा दरमहा विविध कारणांमुळे अनादर होतो. त्यासाठी संबधित वीज ग्राहकांना यापूर्वी ३५० रुपये दंड लावण्यात येत होता. मात्र आता १ नोव्हेंबरपासून १५०० रुपये किंवा बॅक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल तो दंड म्हणून लावण्यात येत आहे.वीज बिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्यक असते. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. परंतु अनेक वीज ग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात.धनादेश वटण्यास साधारणत: तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ग्राहकाने देय तारखेपूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या तीन दिवस अगोदर धनादेश देणे आवश्यक आहे. मुदतीनंतर वीज बिलाचा भरणा झाल्यास संबंधित ग्राहकांना धनादेशद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागून येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेश बाऊन्स झाला तर आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.राज्यातील सुमारे ३२ लाख ग्राहक दरमहा अंदाजे ५४२ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा भरणा आॅनलाईनद्वारे करतात.महावितरणच्या ग्राहकांकरिता घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप किंवा ईसीएसची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे धनादेशाऐवजी वीज ग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे म्हणणे आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण