शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

एचडीएफसी स्टॅण्डर्ड लाईफ इन्शुरन्स कंपनीला दंड

By admin | Updated: July 6, 2017 02:37 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका सुनावणीदरम्यान एचडीएफसी स्टॅण्डर्ड लाईफ इन्शुरन्स कंपनीने

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच : व्याजासह रक्कम अदा करण्याचे आदेश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका सुनावणीदरम्यान एचडीएफसी स्टॅण्डर्ड लाईफ इन्शुरन्स कंपनीने तक्रारकर्त्याला १२ टक्के व्याजासह रक्कम, शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई १० हजार आणि तक्रारीचा खर्च ५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. प्राप्त माहितीनुसार, शेतीचा व्यवसाय असणारे वाठोडा, नागपूर येथील रहिवासी अशोक मलघटे यांना एचडीएफसी स्टॅण्डर्ड लाईफ इन्शुरन्स कंपनीने तीन वर्षांत दुप्पट रक्कम देण्याची लालूच दाखवून कंपनीच्या पॉलिसीमध्ये रक्कम गुंतविण्यास सांगितले. कंपनीने मलघटे यांना त्यांची कुवत नसताना अर्धवार्षिक दोन लाख रुपये अर्थात वार्षिक चार लाख रुपये प्रीमियम असलेली पॉलिसी ३० नोव्हेंबर २००७ रोजी विकली आणि दोन लाख रुपये घेतले. मात्र कंपनीने पॉलिसी पाठविली नाही. त्यामुळे फ्री-लूकमध्ये पॉलिसी परत करण्याचा पर्याय मलघटे यांना वापरता आला नाही. मलघटे यांनी पॉलिसी रद्द करून पैसे परत मिळविण्यासाठी १६ मे २००८ रोजी कंपनीकडे मागणी केली. पण कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणी मलघटे यांनी विमा लोक न्यायालयाकडे तक्रार केली, पण काहीच फायदा झाला नाही. तक्रारकर्त्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रारीसोबत दोन लाख रुपये जमा केल्याची पावती, पॉलिसी रद्द करण्याचे पत्र, कंपनीचे दिलगिरी पत्र, इन्शुरन्स कंपनीकडे केलेली तक्रार, ई-मेल, नोटीस इत्यादी दाखले दिले. मंचने कंपनीचे चेअरमन आणि नागपूरचे शाखा व्यवस्थापक यांना नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिल्याने प्रकरण त्यांच्याविरुद्ध एकतर्फी चालविण्यात आले. या प्रकरणी निकाल देताना मंचचे अध्यक्ष मनोहर चिलबुले, सदस्य प्रदीप पाटील आणि सदस्य मंजूश्री खनके यांनी तक्रारकर्त्याला ४ लाख रुपये, त्यावरील व्याज, नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च देण्याचे आदेश दिले. त्यानंतरही रक्कम न दिल्यामुळे सुनावणीदरम्यान तक्रारकर्त्याच्या वकिलांनी कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकाविरुद्ध गैरजमानती वॉरंट काढण्याची मागणी केली. त्यावेळी कंपनीच्या वकिलांनी तक्रारकर्त्याला ४.२७ लाख रुपयांचा धनादेश आणि नुकसान भरपाई १० हजार आणि ५ हजार रुपये खर्च मंचाकडे जमा केले. मलघटे यांच्या बाजूने अ‍ॅड. डॉ. सुरेंद्र खरबडे यांनी बाजू मांडली.