शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच चणा डाळीपेक्षा वाटाणा डाळ महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 21:42 IST

स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच चणा डाळीपेक्षा वाटाणा डाळ महाग विकण्यात येत आहे. मुंबई पोर्टवर आयातीत चण्याचे भाव ४२०० रुपये तर चण्याचे क्विंटल भाव ४२०० रुपये आहेत.

ठळक मुद्देवाटाण्याच्या आयातीला मर्यादा : देशात उत्पादन कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच चणा डाळीपेक्षा वाटाणा डाळ महाग विकण्यात येत आहे. मुंबई पोर्टवर आयातीत चण्याचे भाव ४२०० रुपये तर चण्याचे क्विंटल भाव ४२०० रुपये आहेत.दोन ते तीन वर्षांपूर्वी कॅनडा आणि युके्रनमधून वाटाण्याची मोठ्या प्रमाणात आयात व्हायची. वाटाणा ठोकमध्ये २००० ते २२०० रुपये आणि डाळ २६०० ते ३००० रुपये क्विंटल विकण्यात येत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळत नव्हता. परिणामी शेतकऱ्यांनी लागवड कमी केली आणि पीक कमी आले. देशात दरवर्षी ४ लाखांपर्यंत वाटाण्याची आयात व्हायची. पण केंद्र सरकारने आयातीवर ५० टक्के, नंतर १०० टक्के आयात शुल्क आणि यावर्षी वार्षिक १.५ लाख टनापर्यंत निर्बंध लावले. एकीकडे उत्पादन कमी आणि दुसरीकडे आयातीवर निर्बंध लावल्यामुळे देशात वाटाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे वाटाणा डाळीचे क्विंटल भाव ठोक बाजारात ५८०० ते ६००० रुपयांवर पोहोचले आहेत. त्या तुलनेत चणा डाळ प्रति क्विंटल ५२०० रुपये क्विंटल विकल्या जात असल्याची माहिती इतवारी ग्रेन मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी दिली.पूर्वी चणा डाळ महाग झाल्यानंतर वाटाणा डाळीच्या किमती वाढत नव्हत्या. भाव वाढल्यानंतरही किंमत प्रति क्विंटल २८०० ते ३३०० रुपयांच्या आतच राहायची. तसेच चणा डाळ महाग असल्यामुळे त्याला पर्याय म्हणून पदार्थ तयार करण्यासाठी स्वस्त वाटाणा डाळीचा जास्त उपयोग करण्यात येत होता. त्यामुळे लोकांना अनेक वर्षांपासून वाटाणा डाळीची सवय झाली. गावखेडे आणि तालुक्यात याच डाळीची जास्त विक्री व्हायची. सध्या दोन्ही डाळीत ७०० ते ८०० रुपयांचा फरक असतानाही हॉटेलचालक ग्राहकांच्या चवीसाठी वाटाणा डाळीचेच पदार्थ तयार करीत आहेत. त्यामुळे चणा डाळीच्या तुलनेत वाटाणा डाळीला जास्त मागणी आहे. चण्याचे आधारभूत मूल्य ४६५० रुपये असतानाही बाजारात प्रति क्विंटल ४४०० रुपयांत विक्री होत असल्याचे मोटवानी यांनी सांगितले.मोटवानी म्हणाले, सणांच्या हंगामात बाजारात मंदीचे वातावरण आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्या सततच्या वक्तव्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. बाजारात तेजी नसतानाही जमाखोरी, साठ्यावर नियंत्रण, सरकार आपल्याकडील माल विकणार, अशी वक्तव्ये त्यांनी केली आहेत. सरकार आता व्यवसायातही हस्तक्षेप करीत आहेत. सरकारने व्यवसायात हस्तक्षेप करणे बंद करावा, अशी मागणी मोटवानी यांनी केली.

टॅग्स :Inflationमहागाईbusinessव्यवसाय