शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

नियमानुसार वेतन द्या, अन्यथा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2015 02:56 IST

विभागातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन देण्यात येत नाही ही नेहमीचीच ओरड असते.

नागपूर : विभागातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन देण्यात येत नाही ही नेहमीचीच ओरड असते. या महाविद्यालयांवर कारवाईचे प्रमाणदेखील नगण्यच आहे. परंतु ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) यासंदर्भात आता ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थांनी कर्मचाऱ्यांना नियमांनुसार वेतन व भत्ते देण्याचे निर्देश ‘डीटीई’कडून देण्यात आले आहेत. ज्या संस्था यांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.अनेक विनाअनुदानित संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. तसेच मिळणारे वेतन हे शासन तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियमांनुसार नसते. संस्थेला अंतिम मान्यता दिली जात असताना कर्मचाऱ्यांना वेळेवर व नियमांनुसार वेतन देण्यात येईल, अशी अटच टाकण्यात येते. परंतु संस्था त्यांचे पालन करत नाहीत. परिणामी कमी वेतनाअभावी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासंदर्भात ‘डीटीई’ला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. मुंबई युनिव्हर्सिटी अ‍ॅन्ड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या ३०० सदस्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर तक्रारींचा ओघ वाढला व ‘डीटीई’ने या मुद्यावर ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेतला. नागपूर विभागातील अनेक महाविद्यालयांबाबतदेखील तक्रारी प्राप्त झाल्या असून विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी यासंदर्भात सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र लिहिले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमांनुसार वेतन देण्यात येत नसल्याच्या तक्रारी येत असून यापुढे जर यात तथ्य आढळले तर संस्थेवर नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येईल. शिवाय संबंधित संस्थेविरुद्ध कारवाईसाठी शासनाकडेदेखील शिफारस करण्यात येईल, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तांत्रिक शिक्षणाशी संबंधित महाविद्यालयांचे धाबे दणाणले असून कारवाईची कुऱ्हाड पडू नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)