शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

टॅक्सी चालकांना प्रत्येकी ३० हजार रुपये द्या : हायकोर्टात जनहित याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 8:17 PM

परवानाधारक टॅक्सी, ऑटोरिक्षा व स्कूल बसच्या मालक-चालकांना प्रत्येकी ३० हजार रुपयाची मदत करण्यात यावी, त्यांचा २५ लाख रुपयाचा विमा काढण्यात यावा आणि या वाहनांच्या सर्व कागदपत्रांची मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात यावी, या मागण्यांसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२५ लाख रुपयाचा विमाही मागितला

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : परवानाधारक टॅक्सी, ऑटोरिक्षा व स्कूल बसच्या मालक-चालकांना प्रत्येकी ३० हजार रुपयाची मदत करण्यात यावी, त्यांचा २५ लाख रुपयाचा विमा काढण्यात यावा आणि या वाहनांच्या सर्व कागदपत्रांची मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात यावी, या मागण्यांसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दीपक साने, प्रवीण नारदेलवार, अशोक मेंढे, कर्णवीर कोल्हे व अनिल शाहू अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत.देशात मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. तेव्हापासून परवानाधारक टॅक्सी, ऑटोरिक्षा व स्कूल बसच्या मालक-चालकांचा व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आहे. सध्या कोरोना संक्रमण सतत वाढत असल्यामुळे अनलॉक काळातही व्यवसाय रुळावर आला नाही. या परिस्थितीत वाहन कागदपत्रांच्या नूतनीकरणाची सक्ती केल्यास परवानाधारक टॅक्सी, ऑटोरिक्षा व स्कूल बसच्या मालक-चालकांवर दुहेरी आघात होईल. त्यातून ते सावरू शकणार नाहीत. त्यांनी रस्ते कर, विमा, परवाना, पीयूसी, फिटनेस, व्यावसायिक कर, पर्यावरण कर इत्यादीची जानेवारी-२०२० पर्यंत पूर्तता केली आहे. त्याची मुदत ३१ डिसेंबर-२० वै२१ पर्यंत वाढविणे आवश्यक आहे. याशिवाय या मालक-चालकांना २५ लाख रुपयाचा विमा व पीएम केअर फंडमधून ३० हजार रुपये दिल्यास जगण्याच्या घटनात्मक अधिकाराचे संरक्षण होईल, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकेत पीएम केअर फंड, इन्शुरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेन्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, केंद्रीय वित्त मंत्रालय, केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय, राज्याचे मुख्य सचिव, परिवहन विभागाचे प्रधान सचिव व परिवहन आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अरविंद वाघमारे कामकाज पाहतील.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTaxiटॅक्सी