शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियावर वाचून रुग्ण कोरोनासाठी करताहेत विशिष्ट औषधांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 11:22 IST

व्हॉटस्अ‍ॅप, सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर वाचून रुग्ण नेमके तेच औषध देण्यास डॉक्टरांना भंडावून सोडत आहेत.

ठळक मुद्देडॉक्टरांमध्ये नाराजी रेमेडेसिवर, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन, फॅविपिरावीर, टॉसिलिझुमॅब किंवा प्लाझ्मा थेरपी देण्याचा आग्रह

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हीच औषध दिल्यानंतर कोरोनाचा रुग्ण बरा होतो, असे कुणीही खात्रीलायक सांगू शकत नाही. अद्यापही विविध औषधे, प्रतिबंधक लस व थेरपीवर संशोधन सुरू आहे, असे असताना बहुसंख्य रुग्ण त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारावर विश्वास न ठेवता, व्हॉटस्अ‍ॅप, सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर वाचून नेमके तेच औषध देण्यास डॉक्टरांना भंडावून सोडत आहेत. विशेष म्हणजे, रेमेडेसिवर, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन, फॅविपिरावीर, आयटोलिझुमॅब, टॉसिलिझुमॅब किंवा प्लाझ्मा थेरपी देण्याचा आग्रह रुग्ण धरीत असल्याने काही डॉक्टरांमध्ये नाराजी आहे.विदर्भात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. बुधवारी बाधितांची संख्या ७,८४३ वर पोहचली तर २२४ रुग्णांचा मृत्यू झाला. या आजाराला घेऊन सर्वांच्या मनात भीती आहे. यामुळे एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास तो डॉक्टरांकडे प्रभावी औषधोपचाराची मागणी करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, कोविड हॉस्पिटल, कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटरमधील रुग्णांवर करण्यात येणाऱ्या औषधोपचाराची राज्याच्या कोरोनाविषयक कृती दलाने काही उपचारपद्धती आखून दिली आहे. त्यामध्ये रुग्णांसाठी आवश्यक असणारे औषध ते किती प्रमाणात कोणत्या प्रसंगी द्यावे हे सांगण्यात आले आहे. सध्या डॉक्टर ज्या उपचारपद्धतीचा वापर करत रुग्णांना उपचार देत आहेत, त्याने नक्कीच रुग्णांना फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु त्यानंतरही रुग्ण भीतीपोटी डॉक्टरांकडे विविध औषधांची मागणी करून त्रास देत असल्याचे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

रेमेडेसिवीर : सध्या केवळ गंभीर रोग असलेल्या रुग्णालयातच याचा वापर केला जातो. हा जीव वाचवणारा म्हणून मानला जातो. महाराष्ट्र शासनाने ज्या जिल्ह्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे तेथील रुग्णालयात ही औषध उपलब्ध करून दिली आहे. परंतु लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांकडून या औषधीची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. समजावून सांगिल्यानंतरही अनेकवेळा रुग्ण जीवाच्या भीतीपोटी ऐकत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

-फॅविपिरावीर : या औषधीवर नागपुरातील मेडिकलमध्ये संशोधन सुरू आहे. तोंडावाटे देण्यात येणारे हे औषध सध्या केवळ सौम्य किंवा मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना दिले जात आहे. लक्षण नसलेले रुग्णांकडून या औषधाचीही मागणी होते.

-टॉसिलिझुमॅब : ही एक लस आहे. जे रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आहेत आणि ज्यांच्या शरीरातील इतर अवयवांवर सूज आली असेल त्या रुग्णांना ही लस दिली जाते. परंतु याच्या वापरामुळे जीवाणूच्या संसर्गाची जोखीम वाढू शकते. यामुळे लस देताना डॉक्टर रुग्णाला याची माहिती देऊनच लस देतात. परंतु अलीकडे किडनी, यकृताचा आजार असलेल्या रुग्णांकडून ही लस देण्याची मागणी होत आहे.

-आयटोलिझुमॅब : ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडियाने (डीसीजीआय) या लसीला परवानगी दिली आहे. ही लस मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्या व श्वसनाचा त्रास होत असलेल्या रुग्णांना आणीबाणीच्यावेळी दिले जाते. परंतु न्युमोनियाची सामान्य लक्षणे असलेले रुग्ण या औषधाची मागणी करतात.

-प्लाझ्मा थेरपी : प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्या देशभर सुरू आहेत. या थेरपीचे नागपूर केंद्र ठरले आहे. परंतु, सध्या हे सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि केवळ डॉक्टरांनी मंजूर केलेल्या निवडक रुग्णांना त्यांच्या संमतीनंतर प्लाझ्मा दिले जात आहे. प्लाझ्मा ट्रायल्ससाठी मध्यम ते गंभीर मध्यम रुग्णांची निवड केली जात आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस