शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्लॅब कोसळून रुग्ण व नातेवाईकाचा मृत्यू; जीर्ण स्लॅबकडे बांधकाम विभागाचे झाले होते दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 21:31 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागाच्या प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळल्याने एका वयोवृद्ध रुग्णाचा व एका महिला रुग्णाच्या नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला.

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागाच्या प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळल्याने एका वयोवृद्ध रुग्णाचा व एका महिला रुग्णाच्या नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास झालेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना सकाळच्या सुमारास झाली असती तर मोठी जीवितहानी झाली असती, असेही बोलले जात आहे.देवनाथ रामचंद्र बागडे (६६) रा. पंचशीलनगर, सावनेर व वनिता वाघमारे (३५) रा. भांडेवाडी अशी मृतांची नावे आहेत. मेडिकलच्या मुख्य इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या त्वचा रोग विभागाच्या या इमारतीत महिला आणि पुरुषांचे २०-२० खाटांचे दोन स्वतंत्र वॉर्ड आहेत. घटनेच्या दिवशी म्हणजे गुरुवारी, १७ पुरुष व १२ महिला रुग्ण वॉर्डात उपचार घेत होते. प्राप्त माहितीनुसार, सायंकाळी ५  वाजताच्या सुमारास वॉर्डात भरती असलेल्या जयमाला राजकुमार दहिवले (४०) यांना एक्स-रे काढण्यासाठी मेडिकलला पाठविण्यात आले. त्यांच्या नातेवाईक वनिता वाघमारे या वॉर्डात थांबून होत्या. सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास त्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या होत्या.याचवेळी वॉर्डात भरती असलेले देवनाथ बागडे हे वयोवृद्ध रुग्ण याच ठिकाणी उभे होते. याचवेळी अचानक मोठा आवाज होऊन त्यांच्यावर स्लॅब कोसळली. वॉर्डातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर, परिचारिका धावत बाहेर आले. तातडीने याची माहिती उपस्थित डॉक्टरांनी अग्निशमन दलाला दिली. परंतु ते पोहचण्यापूर्वी स्लॅबखाली अर्धवट अवस्थेत दबलेल्या वनिता वाघमारे या महिलेला काढण्याचा लोकांनी प्रयत्न सुरू केला. महिलेला बाहेर काढले तेव्हा ती बेशुद्धावस्थेत होती. तिला तातडीने ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. परंतु उपचार मिळण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.याचदरम्यान बांधकाम विभागाचे जेसीबी वाहन घटनास्थळी दाखल झाले. वाहनाने स्लॅब उचलली तेव्हा त्याखाली देवनाथ बागडे यांचा मृतदेहच आढळून आला. या घटनेने भरती रुग्ण व नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती होताच अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, त्वचा रोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. जयेश मुखी, मेट्रन मालती डोंगरे, बांधकाम विभागाचे जयस्वाल यांनी धाव घेतली. डॉ. मित्रा यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.