शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यात ९३७० खड्डे बुजवले, तर नागपूरच्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 10:01 IST

चार महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरातील विविध रस्त्यांवरील ९ हजार ३७० खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाचा आहे. असे असतानाही रस्त्यांवर खड्डे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्देसिमेंट रोड असलेल्या मार्गावरील खड्ड्यांचाही समावेश

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्याला सुरुवात झाली की शहरातील सर्वच भागातील रस्त्यांवर खड्डे पडतात. महापालिकेच्या हॉटमिक्स विभागाकडे खड्डे बुजविण्याची जबाबदारी आहे. खड्डे बुजविण्यावर दरवर्षी कोट्यवधीचा खर्च केला जातो. प्रत्यक्षात तक्रार करूनही खड्डे बुजवले जात नाहीत, असा शहरातील नागरिकांचा अनुभव आहे. एप्रिल ते जुलै या गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत शहरातील विविध रस्त्यांवरील ९ हजार ३७० खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाचा आहे. असे असतानाही शहरातील रस्त्यांवर खड्डे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.हॉटमिक्स विभाग जेटपॅचरसह तीन मशीनच्या साह्याने रस्ते दुुरुस्ती व खड्डे बुजवण्याचे काम करतो. आसीनगर झोनमध्ये सर्वाधिक १५६६ खड्डे बुजवण्यात आलेले आहेत. तर सतरंजीपुरा झोनमध्ये सर्वात कमी ५१८ खड्डे बुजविण्यात आलेले आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजवण्यासाठी तरतूद केली जाते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने अर्थसंकल्पात तरतूद केली तरी प्रत्यक्षात त्यानुसार निधी उपलब्ध होत नाही. मागील तीन वर्षात ११६.१४ कोटींची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात २४ कोटींचा निधी उपलब्ध झाला. वर्षाला ८ ते ९ कोटी रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीवर खर्च केले जातात. एप्रिल ते जुलै या कालावधीत पाच ते सात कोटींचा खर्च करण्यात आला. परंतु त्यानंतरही रस्त्यांवरील खड्डे कायम आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी बनविण्यात आलेल्या सिमेंट रोडचाही खड्डे बुजवण्यात आलेल्या ठिकाणात समावेश आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

२.१० लाख चौरस फूट खड्डे दुरुस्तीचा दावाहॉटमिक्स विभागाने गेल्या चार महिन्यात नादुरस्त रस्त्यांवर बुजवण्यात आलेल्या खड्ड्यांचे क्षेत्रफळ २ लाख १० हजार ५५ चौ.फूट आहे. तसेच १ हजार ४८६ पॅचेस बुजवण्यात आले आहेत. याचे क्षेत्रफळ १७ हजार २७१ चौ. फूट आहे.

खड्डे पावसामुळे, बुजवण्याचे काम सुरूआयआरडीपी रोड बनविण्याला १७ ते १८ वर्षे झालेली आहेत. रोडच्या बाजूला असलेल्या पावसाळी नाल्या व्यवस्थित नसल्याने पावसाचे पाणी रोडवर साचते. अनेक रस्ते दुरुस्तीला आलेले आहेत. तसेच शहरात मोठ्याप्रमाणात विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडतात. चार महिन्यात हॉटमिक्स विभागातर्फे खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ९३७० खड्डे बुजवण्यात आलेले आहेत. यावर दोन ते तीन कोटींचा खर्च झालेला आहे.- यू.बी. लांजेवार,यांत्रिकी अभियंता(हॉटमिक्स)

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका