शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात संपामुळे प्रवाशांचा खासगी बसने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 22:43 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचा खोळंबा होऊन प्रवाशांना खासगी बसेसने प्रवास करण्याची पाळी आली. दरम्यान एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात ८५ टक्के फेऱ्या रद्द होऊन ४० लाखाचा फटका बसल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देविभागाला ४० लाखाचा फटका : दुसऱ्या दिवशीही ८५ टक्के बसेस बंद

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचा खोळंबा होऊन प्रवाशांना खासगी बसेसने प्रवास करण्याची पाळी आली. दरम्यान एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात ८५ टक्के फेऱ्या रद्द होऊन ४० लाखाचा फटका बसल्याची माहिती आहे.वेतन वाढीवर नाराज झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून संप सुरू केला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी या बंदचा फारसा परिणाम जाणवणार नसल्याचे भाकीत प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. परंतु दुसऱ्या दिवशीही कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे एसटीची ८५ टक्के वाहतूक ठप्प होती. नागपूर विभागात सकाळी ६ ते रात्री ८ दरम्यान एकूण १०७३ फेऱ्यांपैकी १५४ फेऱ्याच बाहेर पडल्या तर ९१९ बस फेऱ्या रद्द करण्याची पाळी महामंडळावर आली. यामुळे संपाच्या दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे हाल झाले. अनेक प्रवाशांना खासगी बसेसने प्रवास करण्याची पाळी आली. संप सुरु असल्यामुळे असंख्य प्रवाशांनी आपला प्रवासाचा बेतच रद्द केला. संप सुरू असल्यामुळे एसटी महामंडळाच्या गणेशपेठ आगारात चालक-वाहक नारेबाजी करताना दिसले. संपावर तोडगा न निघाल्यास खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून दरवाढ करण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून यामुळे प्रवाशांची गैरसोय आणखी वाढणार आहे.शनिवारी रात्री ८ पर्यंतची स्थितीएकूण फेऱ्या १०७३रद्द फेऱ्या ९१९पूर्ण झालेल्या फेऱ्या १५४

टॅग्स :ST Strikeएसटी संपnagpurनागपूर