शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

क्षमतेच्या ४० टक्क्यापेक्षा कमी प्रवासी : इथेनॉल बसचा दिवसाला तोटा १० ते १९ हजार रुपये

By admin | Updated: April 20, 2017 02:40 IST

नागपूर, नागपूर महानगरपालिका इथेनॉलवर चालणाऱ्या पाच हिरव्या बसेससुद्धा शहरात सिटी बस म्हणून चालवते.

सोपान पांढरीपांडे   नागपूर नागपूर, नागपूर महानगरपालिका इथेनॉलवर चालणाऱ्या पाच हिरव्या बसेससुद्धा शहरात सिटी बस म्हणून चालवते. या एसी बसचे तिकीट लाल बसच्या पावणे दोन पट आहे. त्यामुळे या हिरव्या एसी बसेसना प्रवासीच मिळत नाहीत. त्यामुळे या बसेस चक्क लाल बसच्या महसुलातून चालत आहेत. ‘‘हिरव्या एसी बसची आसन क्षमता ३२ आहे व शिवाय १६ प्रवासी उभे राहू शकतात. त्यामुळे एकूण प्रवासी क्षमता ४८ होते. परंतु भाडे अधिक असल्याने प्रत्येक बसमध्ये १० ते १४ प्रवासीच प्रवास करतात’’, अशी माहिती मनपाचे परिवहन व्यवस्थापक शिवाजीराव जगताप यांनी दिली.या बसेस चालवण्याचे कंत्राट बंगलोरच्या स्कॅनिया कमर्शियल व्हेईकल्स प्रा. लि. ला मिळाले आहे. या बससाठी मनपा स्कॅनियाला तब्बल ८५ रुपये प्रति किलोमीटर या दराने भाडे देणार आहे. या बसेस मोरभवन बस स्थानकातून, बुटीबोरी (२६ किमी), हिंगणा (१२ किमी), अंबाझरी आॅर्डनन्स फॅक्टरी (१३ किमी), कळमेश्वर (२२ किमी) व कन्हान (२३ किमी) या पाच मार्गावर चालतात अशी माहिती स्कॅनियाचे सिनियर मॅनेजर (सर्व्हिस), रविप्रकाश प्रजापती यांनी दिली. सदर्हू वार्ताहराने या एसी बसमधून सीताबर्डी ते बुटीबोरी असा दोन तासाचा (एक फेरी) प्रवास केला. त्यावेळी बसमध्ये शेवटपर्यंत जाताना १६ प्रवासी व येताना १२ प्रवासी होते. कंडक्टरच्या म्हणण्याप्रमाणे एका फेरीत रु. १६०० ते रु. २००० पर्यंत महसूल मिळतो.या माहितीवर आधारित बसचा महसूल व बसवर भाड्यापोटी होणारा खर्च यांचा मेळ घातला असता बुटीबोरी बसला आठ तासांच्या शिफ्टमध्ये तब्बल ९६८० रु. तोटा होतो तर दर दिवशी (दोन शिफ्ट) हा तोटा १९,३६० रुपये होतो. यावरून या हिरव्या इथेनॉल बसेस तोट्यात असून त्या लाल बसेसच्या महसुलातून चालत आहेत, हे स्पष्ट आहे. प्रवासीच नसताना इथेनॉल बसचा अट्टाहास का? २०१५ मध्ये नागपुरात प्रायोगिक तत्त्वावर इथेनॉलवर चालणारी एसी प्रथमच रस्त्यावर आली. त्यानंतर अशा ५५ बसेस चालविण्यासाठी मनपाने २०१६ साली निविदा मागविल्या. या निविदेला या बसेसचे उत्पादन करणाऱ्या स्कॅनिया कमर्शियल व्हेईकल्स व अँथनी गॅरेज या दोनच कंपन्यांनी प्रतिसाद दिला. अँथनी गॅरेजजवळ इथेनॉल बसेस चालवण्याचा पूर्वानुभव नव्हता म्हणून ती निविदा बाद झाली व कंत्राट स्कॅनियाला देण्यात आले. सध्या कंपनीने ५५ पैकी पाच बसेस रस्त्यावर आणल्या आहेत अशी माहिती जगताप यांनी दिली.परंतु प्रवासीच मिळत नसल्याने या इथेनॉल बसेस तोट्यात चालत आहेत तरीही हिरव्या बसेसचा अट्टाहास का? या प्रश्नाचे उत्तर जगताप यांचेकडे नव्हते.