शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

वृक्षलागवडीच्या वन आंदोलनात सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:28 IST

हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी १३ कोटी वृक्षलागवडीच्या विशेष मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी १३ कोटी वृक्षलागवडीच्या विशेष मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.राज्यातील १३ कोटी वृक्ष लागवड मोहीम अंतर्गत वनामती येथे नागपूर विभागात राबविण्यात येत असलेल्या वृक्षलगवड तसेच पूर्व तयारीचा आढावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. त्याप्रसंगी आवाहन करताना ते बोलत होते. नागपूर विभागाला २ कोटी ६२ लक्ष ६५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून वृक्षलागवडीच्या विशेष मोहिमेत विविध विभागांना दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे वृक्षारोपण करण्यासंदर्भात त्यांनी आढावा घेतला.यावेळी खासदार रामदास तडस, आमदार नाना शामकुळे, आ. आशिष देशमुख, आ. समीर कुणावार, आ. कृष्णा खोपडे, अ‍ॅड. संजय धोटे, आ. गिरीश व्यास, आ. प्रकाश गजभिये, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, चंद्रपूरच्या महापौर अंजली धोटेकर, वन विभागाचे सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त अनुप कुमार, सामाजिक वनिकरण विभाग प्रधान मुख्य वन संरक्षक (पुणे) अनुराग चौधरी, प्रधान मुख्य वन संरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन, नागपूर) शेषराव पाटील, मुख्य वन संरक्षक नागपूर संजीव गौर, सामाजिक वनिकरण वनसंरक्षक अशोक गिºहेपुंजे आदी उपस्थित होते.बॉक्स..वृक्ष संगोपनाचे व्हिडिओ शुटींगमागील वर्षी लावण्यात आलेल्या वृक्षापैकी ८० टक्केवर वृक्ष जिवंत आहेत. गेल्या दोन वर्षात २७३ चौरस किमी वनेतर क्षेत्र तयार करण्यात आले असून याची दखल केंद्र्र शासनाने घेतली आहे. वृक्ष लागवड ही लोकचळवळ करण्याचा प्रयत्नआहे. यासाठी ग्रीन आर्मी तयार करण्यात आली आहे. संपूर्ण जगभरातील सर्वाधिक मोठी आर्मी असणार आहे. यासोबतच इको बटालियनचीही मदत घेतली जात आहे. वृक्ष लगावडीच्या कामात अधीक पादर्शकता यावी, यासाठी वृक्ष लागवडीचे व त्याच्या संगोपनाचेही व्हिडिओ शुटींग करण्यात येणार असून ही विभागाच्या बेवसाईटवर असणार आहे. शिवाय कुणालाही वनक्षेत्रांसंदर्भात कुठलही शंका असल्यास १९२६ क्रमांकाच्या टोलफ्रीवर माहिती घेता येईल, असे त्यांनी सांगितले.बॉक्स...नदी-नाल्याच्या काठावर लावणार वृक्षवृक्षलागवड मोहीम राबविताना नदी काठावर वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून त्यासाठी वन विभागाने १ हजार १७० किलोमीटर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच शासकीय जागेवर २ हजार ९२० हेक्टर तर खाजगी जागेवर १५ हजार २०४ हेक्टर वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट आहे.बॉक्स..राज्यात १ कोटी बांबूची लागवडराज्यात १ कोटी बांबूची लागवड करणे बांबू संशोधनासोबतच रोजगाराचे प्रमुख साधन म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी अमरावती, औरंगाबाद व राहुरी विद्यापीठात बांबू सेंटर सुरु करण्यात येणार आहे. तसेच बांबूचे ४४६४ चौरस हेक्टर क्षेत्र वाढल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.बॉक्स..वृक्षारोपणासाठी विविध उपक्रमगडचिरोली जिल्ह्याच्यावतीने जनजागृतीसह १५ जूनपासून ‘एक विद्यार्थी एक झाड’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. चंद्र्रपूर महानगरपालिकेच्या वतीने ‘एक कर्मचारी तीन रोपटे ’ तसेच वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ‘आॅक्सिजन पार्क’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. याशिवाय सामाजिक संस्थेच्या मदतीने वर्धा जिल्ह्यात ‘झाडांचे गाव’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात ‘माझी कन्या भाग्यश्री बालोद्यान’ तसेच गोंदिया जिल्ह्यात तलाव काठी वड, पिंपळ व उंबराच्या झाडाचे रोपण करण्यात येणार असल्याचे संबंधित जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. याशिवाय सुखदु:खात वृक्षाची साथ हा उपक्रम देखील राबविण्यात येणार आहे. प्रसंगानुसार गेल्या एक वर्षात जन्मलेल्या किंवा मृत्यु झालेल्या कुटुंबीयांना रोपटे देऊन या मोहिमेत सहभागी करण्यात येईल.बॉक्स...असे आहे वृक्षलागवडीेचे उ्िदष्टजिल्हा वृक्ष लागवड उद्दिष्टनागपूर ४३ लाख ४४ हजार,वर्धा ३३ लाख ०७ हजार,भंडारा २४ लाख ५९ हजार,गोंदिया ३४ लाख ६० हजार,चंद्रपूर ७७ लाख २१ हजार तरगडचिरोली ५० लाख ७४ हजारप्रचार रथाला हिरवी झेंडीवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्षारोपण मोहिमेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखविली. ग्रामीण भागात तसेच नागरी भागातही १३ कोटी वृक्षारोपण मोहिमेबद्दल जनजागृती करण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम सुरु केली आहे.

 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारforestजंगल