शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पारधींनाही हवाय जगण्याचा अधिकार ; मोर्चाच्या माध्यमातून रेटल्या मागण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 22:41 IST

अपराधी जमात म्हणून समाज आणि शासन पारधी समाजाकडे दुर्लक्ष करीत आले आहे. शिकार करणे, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या  समाजावर शासनाने शिकारीवर बंदी आणून उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देआदिवासी विभागामार्फत २०० कोटींचे पारधी पॅकेज द्यावप्रत्येक कुटुंबाला ४५ किलो धान्य देण्यात यावे

आॅनलाईन लोकमतनागपूर : अपराधी जमात म्हणून समाज आणि शासन पारधी समाजाकडे दुर्लक्ष करीत आले आहे. शिकार करणे, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या  समाजावर शासनाने शिकारीवर बंदी आणून उपासमारीची वेळ आली आहे. भारतीय संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. परंतु आमचा समाज अस्पृश्यतेखाली जीवन जगत आहे. शासनाने पारधी समाजाचा सर्वे करून, पारधी कृती आराखडा तयार करावा, उपेक्षित जीवन जगणाऱ्या पारध्यांना शैक्षणिक सवलती, घरकुल उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या घेऊन आदिवासी पारधी समाज संघटना व आदिवासी पारधी युवा विकास परिषदेच्या माध्यमातून विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाच्या शिष्टमंडळाने आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांना निवेदन दिले. या मोर्चाचे नेतृत्व बाबूसिंग पवार, राजेंद्र काळे, रजनी पवार, रेखा कराड, देशराज पवार, नरेश पवार, आतिष पवार, अनिल पवार, सिकंदर पवार, प्रकाश पवार आदींनी केले. हिंगोली जिल्ह्यातील जोडतोंडा गावात झालेल्या खून प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, शासनाच्या निकषाप्रमाणे अतिक्रमित जमिन, त्वरित पट्टे व सातबारा देऊन नावाने करावे, आदिवासी विभागामार्फत २०० कोटींचे पारधी पॅकेज द्यावे, समाजाच्या शिक्षित युवकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे, छबरी आदिवासी विकास महामंडळांतर्गत देण्यात येणाऱ्या  घरकूल निधीमध्ये वाढ करावी, पारधी तांड्यावर बालसंस्कार केंद्र व अंगणवाडी देण्यात यावी, प्रत्येक कुटुंबाला ४५ किलो धान्य देण्यात यावे आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

 

टॅग्स :Nagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशनVidhan Bhavanविधान भवन