शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

परातेंना सरकारी वकील पदावरून हटवा : न्यायाधीश संघटनेची हल्ला प्रकरणात उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 20:46 IST

पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेने उडी घेतली आहे. हल्लेखोर सहायक सरकारी वकील अ‍ॅड. दीपेश मदनलाल पराते यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांसह संघटनेच्यावतीने विधी व न्याय विभाग आणि गृह विभागाचे प्रधान सचिवांना निवेदन सादर करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष दिलीप घुमरे व उपाध्यक्ष दिनेश कोठाळीकर यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

ठळक मुद्देराज्य सरकारला दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेने उडी घेतली आहे. हल्लेखोर सहायक सरकारी वकील अ‍ॅड. दीपेश मदनलाल पराते यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांसह संघटनेच्यावतीने विधी व न्याय विभाग आणि गृह विभागाचे प्रधान सचिवांना निवेदन सादर करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष दिलीप घुमरे व उपाध्यक्ष दिनेश कोठाळीकर यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.पराते यांना सहायक सरकारी वकील पदावरून हटविण्यात यावे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पराते यांच्याविरुद्ध फौजदारी अवमानना याचिका दाखल करून घेण्यासाठी दिलेल्या आदेशामध्ये अन्य काही वकिलांची नावे नोंदवली असून त्या वकिलांवरही आवश्यक कारवाई करण्यात यावी, यापुढे हे प्रकरण दाबण्याचा किंवा कमकुवत करण्याचा प्रयत्न होऊ नये याकरिता या प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी आणि न्यायाधीशांना न्यायालयात व निवासस्थानी कडक सुरक्षा पुरविण्यात यावी अशा अन्य मागण्या संघटनेने केल्या आहेत. तसेच, या मागण्या निश्चित कालावधीत पूर्ण करण्याची विनंती केली आहे.संघटनेने या मागण्या सरकारसमक्ष ठेवण्यासोबतच या घटनेचा तीव्र निषेधही केला आहे. हा हल्ला न्यायदान प्रक्रि येत अडथळे निर्माण करण्याचा प्रकार आहे. त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अन्यथा, सामान्य माणसांचा न्यायदान व न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होईल. या हल्ल्यामुळे न्यायाधीशांना मानसिक धक्का पोहोचला आहे. त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई ग्राहक पंचायतच्या प्रकरणात न्यायाधीशांना कडक सुरक्षा पुरविण्याचा आदेश दिला होता. परंतु, त्या आदेशाचे अद्याप पालन झाले नाही. महाराष्ट्र प्रगतिशील राज्य आहे. राज्यातील न्यायव्यवस्थेने कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या हल्ल्यामुळे न्यायव्यवस्था बळकट करण्याच्या प्रयत्नांना धक्का पोहोचला आहे असे मत संघटनेने निवेदनात व्यक्त केले.सरकारी वकिलांवर गंभीर आरोपसंपूर्ण जिल्हा सरकारी वकील कार्यालय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माहिती मोडूनतोडून सादर करण्याचा व आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न होत आहे असा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. तसेच, दोषी सरकारी वकिलांची हकालपट्टी करण्यात यावी असे म्हटले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयadvocateवकिल