शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परदा है परदा, परदे के पिछे परदानशीं है...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 23:54 IST

महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार ऋषीकपूर या दोन अभिनेत्यांनी सिनेप्रेक्षकांवर अधिराज्य गाजविले आहे. या दोघांची जोडी असलेल्या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. नशीब, अमर अकबर अ‍ॅन्थोनी, कभी कभी, कुली, अजुबा अशा अनेक चित्रपटांमधून या जोडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या दोन अभिनेत्यांच्या हिट गीतांची मेजवानी नुकतीच रसिकांना मिळाली.

ठळक मुद्देहिट्स ऑफ अमिताभ अ‍ॅन्ड ऋषी : जोडीच्या गीतांचा रसिकांना आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार ऋषीकपूर या दोन अभिनेत्यांनी सिनेप्रेक्षकांवर अधिराज्य गाजविले आहे. या दोघांची जोडी असलेल्या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. नशीब, अमर अकबर अ‍ॅन्थोनी, कभी कभी, कुली, अजुबा अशा अनेक चित्रपटांमधून या जोडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या दोन अभिनेत्यांच्या हिट गीतांची मेजवानी नुकतीच रसिकांना मिळाली.‘रागा टु रॉक’तर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त ‘हिट्स अमिताभ अ‍ॅन्ड ऋषी’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृह येथे करण्यात आले. १९७० ते ८० च्या दशकातील अमिताभ व ऋषीकपूरच्या सुपरहीट गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. हेमंत दारव्हेकर, संजीव जगताप, गौरी शिंदे, डॉ. सुधीर कुणावार, पूर्वा साल्पेकर, सुचेत्रा पद्मावार, उमा रघुरामन, मृण्मयी जगताप व कांचन इंगळे (संगीत टीचर) यांनी गायलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांना श्रोत्यांनी डोक्यावर घेतले. आनंद दिला. ‘ये कहा आ गये हम..., नीला आसमा सो गया..., अंग्रेजी मे कहते थे..., चल चल मेरे भाई..., लंबूजी लंबुजी, बोलो टिंगूजी..., धूप मे निकला ना करो..., दिलवर मेरे कब तक मुझे..., छुकर मेरे मन को..., एक हसीना थी..., तेरे चेहरे से नजर नही हटती..., परबत के उस पार...परदा है परदा...’ आदी गाण्यांनी रसिकांना मनमुराद आनंद दिला. बाहेर गर्मी असताना सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडत होता. अनेक गीतांना रसिकांनी वन्स मोअरची पसंती दिली.श्वेता शेलगावकर यांच्या ओघवत्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली. संगीत संयोजन महेंद्र ढोले यांचे होते. कार्यक्रमाची संकल्पना इसबाबूल हसन यांची होती. संचालन संगीता जगताप यांनी केले.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर