शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पानठेले, 'बीअर बार'मधील गर्दीमुळे 'कोरोना' होत नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 23:11 IST

‘कोरोना’चा संसर्ग आणखी पसरू नये यासाठी राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये, मॉल्स बंद करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. परंतु शहरातील रेस्टॉरेन्ट्स, मोठी हॉटेल्स, पानठेले, ‘वाईन शॉप्स’ व ‘बीअर बार’ येथील गर्दीवर प्रतिबंध घालण्याचे कुठलेही निर्देश सरकारने अद्याप दिलेले नाहीत.

ठळक मुद्देशाळा-महाविद्यालये बंद, यांनाच सूट का? : जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’चा संसर्ग आणखी पसरू नये यासाठी राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये, मॉल्स बंद करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. परंतु शहरातील रेस्टॉरेन्ट्स, मोठी हॉटेल्स, पानठेले, ‘वाईन शॉप्स’ व ‘बीअर बार’ येथील गर्दीवर प्रतिबंध घालण्याचे कुठलेही निर्देश सरकारने अद्याप दिलेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणच्या गर्दीमुळे ‘कोरोना’चा संसर्ग होत नाही का, असा उपरोधिक सवाल सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.एकीकडे सरकारी कार्यालयांमध्येही गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारने केले आहे. परंतु कोरोनाला खरोखरच प्रतिबंध घालायचा असेल तर पानठेले, बीअर बार, वाईन शॉप्स व रेस्टॉरेन्ट्समधील गर्दीवरदेखील आळा घालणे तेवढेच आवश्यक असल्याचे आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनी म्हटले आहे.सध्या नागपूर शहरात ‘कोरोना’ दुसऱ्या टप्प्यात आहे. तो जर तिसºया किंवा चौथ्या टप्प्यामध्ये गेला तर नागपुरात हाहाकार माजेल. शहरातील फुटपाथवरील हातठेले, पानठेले, हॉटेल्स, बीअर बार आणि वाईन शॉप्स या ठिकाणी आरोग्याबाबत कुठलीही काळजी घेतली जात नसल्याचे ‘लोकमत’ चमूला आढळून आले आहे.शहरातील बहुतांश पानठेल्यांवर दिवसभर गर्दी असते. त्या परिसरात जागोजागी लोक थुंकताना दिसून येतात. शिवाय खर्रा खाणारे लोक शहरभर ‘पिचकाºया’ मारत असतात. ‘बीअर बार’ व ‘वाईन्स शॉप’मध्ये तर सायंकाळनंतर जास्त गर्दी होते. तेथे ना तपासणी होत आहे ना कुणी ‘मास्क’ किंवा ‘सॅनिटायझर’चा वापर करत आहे. येथून संक्रमित होऊन नागरिक शहरात वेगवेगळ््या ठिकाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासंदर्भात तातडीने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत सामाजिक वर्तुळातूनदेखील व्यक्त होत आहे.दारू, खर्रा जीवनावश्यक बाबी नाहीत‘कोरोना’वर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने चार दिवस उपरोक्त ठिकाणे बंद केली तर काही आभाळ कोसळणार नाही किंवा कुणी मृत्युमुखीदेखील पडणार नाही. दारू, खर्रा या गोष्टी काही जीवनावश्यक वस्तू किंवा औषधे म्हणून गणली जात नाही. मग अशा वेळी जिल्हा प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे, असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर