शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पंकज, मयूरा यांनी जिंकली ‘टायगरमॅन’ ट्रायथलॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:03 IST

कोल्हापूरचे पंकज रावलू आणि मयूरा शिवलकर यांनी रविवारी नागपुरात प्रथमच झालेल्या टायगरमॅन ट्रायथलॉनचे क्रमश: पुरुष आणि महिला गटात जेतेपद पटकावले.

ठळक मुद्देनागपूरचे अभय दुरुगकर, तन्वी, रवींद्र तरारे, अंधारे यांचीही चमक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोल्हापूरचे पंकज रावलू आणि मयूरा शिवलकर यांनी रविवारी नागपुरात प्रथमच झालेल्या टायगरमॅन ट्रायथलॉनचे क्रमश: पुरुष आणि महिला गटात जेतेपद पटकावले. प्रो हेल्थ फाऊंडेशनच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.पंकजने ३ किमी जलतरण, १२० कि.मी. सायकल शर्यत आणि २५ किमी दौड ६.३६ तासात पूर्ण केली. मयूराने तिन्ही प्रकारात ९.२४ तास वेळेसह अव्वल स्थान पटकावले. नागपूरचे अभय दुरुगकर यांना ४६ ते ५५ वर्षे वयोगटात ९.५३ तासांसह तिसरे स्थान मिळाले. ५५ वर्षांंवरील वयोगटात नागपूरचेच रवींद्र तरारे यांनी ९.३६ तास वेळेची नोंद करीत दुसरे स्थान संपादन केले. ‘माईल्स न् मायलर्स ’क्लबचे डॉ. निनाद काळे, अश्विन मोकाशी आणि मृणाल वंजारी यांनी देखील टायगरमॅन अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले. रेस पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांचा टायगरमॅन पदक देऊन गौरव करण्यात आला.या आयोजनात आॅलिम्पिक अंतराची ट्रायथलॉन घेण्यात आली. त्यात १५०० मीटर जलतरण, ४० कि.मी. सायकलिंग आणि १० किमी दौड आदींचा समावेश होता. यात नागपूरसह हुबळी, मुंबई, दिल्ली आणि कोल्हापूरचे स्पर्धक प्रामुख्याने सहभागी झाले होते. यात पुरुष गटात अहमदाबादचे मंथन पटेल ३.३ तास वेळेसह विजेते ठरले. महिलांमध्ये मुंबईच्या केतकी साठे यांनी ३.११ तास वेळेसह बाजी मारली. नागपूरची तन्वी तरारे महिलांमध्ये दुसºया आणि स्मिता काजळे तिसºया स्थानी आल्या. आॅलिम्पिक ट्रायथलॉनच्या सांघिक गटात हेमंत काळीकर अािण अनंतकृष्ण्न राजगोपाल यांच्या संघांना क्रमश: पहिले आणि दुसरे स्थान मिळाले. ७५० मीटर पोहणे, २० किमी सायकलिंग आणि ५ किमी दौड या जलद ट्रायथलॉन प्रकारात संजना जोशी आणि स्रेहल जोशी यांनी क्रमश: पहिले आणि दुसरे स्थान मिळविले. पुरुष गटात दक्ष खंते आणि श्रीजीत नायर यांनी बाजी मारली. १० कि.मी. दौड, ४० कि.मी. सायकलिंग आणि ५ कि.मी. दौड या ड्यूथलॉन प्रकारात महिलांमध्ये मंगला पाटील, श्वेता टेकरीवाल आणि सीमा कवनपुरे पहिल्या तीन स्थानांवर आल्या. पुरुष गटात प्रवीण पाटील, वैभव अंधारे आणि बलजित जुनेजा यांनी पहिल्या तीन स्थानांवर झेप घेतली.ड्यूथलॉनच्या सांघिक गटात कविता मुंडले, रश्मी कुलकर्णी आणि अमित जाजू यांच्या नेतृत्वाखालील संघांनी क्रमश: पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान मिळविले. ट्रायथलॉनचे रेस डायरेक्टर डॉ. अमित समर्थ आणि ड्यूथलॉनचे डायरेक्टर सचिन शिरबवीकर हे होते. प्रारंभी शर्यतींना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित आणि डॉ. शांतनू सेनगुप्ता यांनी हिरवा झेंडा दाखवला. पुरस्कार वितरण राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे, मेजर जनरल कुंद्रा, डॉ. संजय जैस्वाल आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिक