शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

नागपुरातील राहुल आग्रेकर हत्याकांडातील आरोपी पंकज हारोडेच्या पोलिसांनी कोलकात्यात आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 15:13 IST

लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर यांचे एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी पंकज हारोडे नामक आरोपीला कोलकाता (हावडा) येथे अटक करून पोलिसांनी गुरुवारी सकाळी नागपुरात आणले.

ठळक मुद्देनागपुरात आणले : दुर्गेश बोकडे साथीदारासह फरारचपैसे संपल्यामुळे केला मेसेज आणि अडकला

आॅनलाईन लोकमतनागपूर : लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर यांचे एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी पंकज हारोडे नामक आरोपीला कोलकाता (हावडा) येथे अटक करून पोलिसांनी गुरुवारी सकाळी नागपुरात आणले.नागपूर-विदर्भात प्रचंड खळबळ उडवून देणारे हे प्रकरण २१ नोव्हेंबरला घडले होते. विदर्भातील मोठे लॉटरी व्यावसायिक समजल्या जाणाऱ्या सुरेश आग्रेकर यांना राहुल आणि जयेश नामक दोन मुले होती. त्यातील राहुल (वय ३७) हा २१ नोव्हेंबरला सकाळी ८. ३० वाजता एक-दीड तासात परत येतो, असे सांगून घराबाहेर गेला. काही अंतर पायी चालत गेल्यानंतर राहुल एका बोलेरोसारख्या वाहनात बसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी बघितले. दुपार झाली तरी परतले नाही म्हणून त्यांची पत्नी अर्पिता यांनी राहुलला फोन केला. यावेळी त्यांनी दीडएक तासात येतो, असे सांगितले. त्यानंतर २ वाजून ८ मिनिटांनी जयेश आग्रेकर यांच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्याने आम्ही राहुलचे अपहरण केले. त्यांना सुखरूप सोडवून घ्यायचे असेल तर एक कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असे सांगितले. यासंबंधाने कुणाकडे वाच्यता केल्यास अथवा पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही मोबाईलवर बोलणाऱ्याने दिली. एक कोटींच्या खंडणीसाठी राहुलचे अपहरण झाल्याचे कळाल्याने आग्रेकर यांनी एकाच वेळी गुन्हे शाखा आणि लकडगंज पोलीस ठाण्यात संपर्क साधला. तेथे तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली.पोलीस चौकशी करीत होते तर तिकडे दुर्गेश आणि पंकज हारोडे यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने राहुलला जिवंतपणी पेटवून देऊन त्याची हत्या केली. दुसºया दिवशी हा थरारक प्रकार उघडकीस आल्यापासून नागपूर-विदर्भात प्रचंड खळबळ उडाली होती. या हत्याकांडाला ८ दिवस झाले तरी आरोपींचा छडा लागत नसल्यामुळे पोलिसांवर प्रचंड दडपण आले होते. आरोपी मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड आदी राज्यात पोलीस पथके आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, बुधवारी सकाळी आरोपींचे लोकेशन हावडा (कोलकाता) येथे असल्याचे कळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक बुधवारी सायंकाळी कोलकात्यात पोहचले आणि त्यांनी आरोपी पंकजच्या मुसक्या बांधल्या.

जावयाला मागितले पैसेआरोपी पंकज आणि दुर्गेश मंगळवारी हावडा (कोलकाता) स्थानकावर पोहचले. जवळचे सर्व पैसे संपल्यामुळे आरोपी पंकजने त्याच्या नागपुरात राहणाऱ्या जावयाला बुधवारी सकाळी व्हॉटस्अ‍ॅप कॉल केला. माझ्याकडे एकही पैसा नाही. मला पैशाची फार गरज आहे, कोलकाता येथे पाठवा, असे तो म्हणाला. दरम्यान, आरोपीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी त्याच्या सर्वच नातेवाईकांच्या हालचालीवर सूक्ष्म नजर ठेवली होती. त्यांना गुन्ह्याचे गांभीर्य समजावून सांगत आरोपींना मदत केल्यास किंवा पोलिसांसोबत लपवाछपवी केल्यास तुमच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची कल्पना दिली होती. त्यामुळे पंकजचा व्हॉटस्अ‍ॅप कॉल येताच पोलिसांना तो कोलकाता येथे असल्याची माहिती कळाली. त्यावरून पोलिसांचे पथक बुधवारी सायंकाळी कोलकाता येथे पोहचले. त्यांनी आरोपीचे हॉटेल शोधून काढत त्याच्या रात्री तेथे मुसक्या बांधल्या. आज गुरुवारी त्याला नागपुरात आणण्यात आले.

आरोपींचे झाले भांडणअपहरण आणि हत्याकांडासारखा गंभीर गुन्हा केल्यानंतर तब्बल ८ दिवसांपासून लपतछपत फिरणाऱ्या आरोपी पंकज आणि दुर्गेशमध्ये मंगळवारी सकाळी वाद झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी थांबले. बुधवारी रात्री पंकजच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. तत्पूर्वीच आरोपी दुर्गेश तेथून पळून गेला. पंकजच्या अटकेनंतर या हत्याकांडाशी जुळलेले अनेक धक्कादायक पैलू उजेडात येणार आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून