शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कार्यादेशादेपूर्वीच पाणंद रस्ते ; राजकीय वजन वापरून बीलही काढले

By गणेश हुड | Updated: May 17, 2024 22:04 IST

११ जणांच्या पॅनलच्या मर्जीने कामाचे वाटप : उपकंत्राटदारांकडून कामे

नागपूर : मातोश्री ग्रामसमृद्धी  पाणंद रस्ते योजना आरोपांच्या भोवऱ्यात अडकली आहे. कार्यादेश नसताना अनेक रस्त्यांची कामे करण्यात आली. यासाठी मुरुमाचा वापर केला नसल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल होणार असल्याने पाणंद रस्त्यांच्या निकृष्ट कामाच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे कार्यादेश काढण्यापूर्वीच काही रस्त्यांची कामे करण्यात आली. एवढेच नव्हे तर राजकीय वजन वापरुन लाखो रुपयांची बिलेही काढली जात असल्याने ही योजना आरोपाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 

पाणंद रस्त्यांच्या कामांच्या मोठयाप्रमाणात तक्रारी   असल्याने पाणंद रस्त्यांचे काम योग्य प्रकारे झाल्याबाबतचे आजुबाजुच्या शेतकऱ्यांचे सहमती पत्र असल्यानंतर कामाचे बील काढण्यात यावे, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष व बांधकाम सभापती कुंदा राऊत यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.  नागपूर  जिल्ह्यात मातोश्री शेतरस्त्याची २७६  कामांना मान्यता देण्यात आली आहे. यासाठी ७०  कोटींचा निधी मंजूर आहे. पाणंद रस्त्यांच्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ११ बड्या ठेकेदारांची समिती नियुक्त केली आहे. यातील काही सदस्य स्वत: पाणंद रस्त्यांचे ठेकेदार आहेत. घेतलेल्या कामासाठी उपकंत्राटदार नियुक्त केले आहेत. या कामावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ठेकेदारांची मनमानी सुरू आहे. पाणंद रस्त्यांसदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी विचारात घेता पाणंद रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे  सहमती पत्र असल्याशिवाय संबंधित कंत्राटदाराला बील देवू नका, असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बजावण्यात आले. पॅनलला अधिकार अन् बांधकाम विभाग बघ्याच्या भूमिकेतजिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची सक्षम यंत्रणा असताना या विभागाकडे पाणंद रस्त्याची कामे न देता  राजकीय नेत्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना पाणंद रस्त्यांची कामे मिळावी यासाठी ११ जणांचे पॅनल नियुक्त करण्यात आले. या पॅनलच्या माध्यमातून कामाला मंजुरी व निधी वाटप सुरू आहे.  पॅनलच्या माध्यमातून आपल्यालाच काम मिळणार असल्याचे गृहीत धरून काही ठेकेदारांनी या रस्त्यांची कामे केली.  दुसरीकडे यंत्रणा असूनही बांधकाम विभाकडे ही जबाबदारी दिली नाही. विभागाने बिलात आडकाठी आणू नये यासाठी राजकीय वजनाचा वापर सुरू आहे. अशा परिस्थितीत चांगल्या कामाची अपेक्षा कशी करणार असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :nagpurनागपूर