शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पटोलेंना अर्धांगवायूचा झटका नव्हे, तर अशक्तपणा आला- डॉक्टर

By admin | Updated: January 29, 2017 21:57 IST

भंडारा-गोंदिया क्षेत्राचे भाजपाचे खासदार नानाभाऊ पटोले यांना अर्धगवायूचा झटका आल्याने नागपुरच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आलं आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 29 - भंडारा-गोंदिया क्षेत्राचे खासदार नाना पटोले यांना रविवारी सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने दुपारी १ वाजताच्या सुमारास नागपुरामधील धंतोलीस्थित न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात अर्धांगवायूचा झटका आला असावा, अशी शंका व्यक्त करण्यात आल्याने डॉक्टरांनी तत्काळ एमआरआय काढला. परंतु अहवाल सामान्य आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. खा. पटोले यांची प्रकृती सामान्य असल्याचे हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांनी सांगितले.रविवारी भंडारा येथील साकोली तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवणीबांध येथे विदर्भस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात उद्घाटक म्हणून खा. पटोले उपस्थित होते. स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवित असताना खा. पटोले यांना अचानक भोवळ आली. त्यांना लागलीच स्पर्धेत उपस्थित डॉक्टरांनी तपासले. तेथून स्थानिक रुग्णालयात नेऊन १०८ क्रमांकाच्या अ‍ॅम्ब्युलन्सने तत्काळ नागपूर गाठून न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांना अर्धांगवायूचा झटका आला असावा, अशी शंका व्यक्त केली जात होती. यामुळे न्यूरॉन हॉस्पिटलचे संचालक व न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांनी तत्काळ एमआरआय काढला. याचा अहवाल सामान्य आला. या संदर्भात लोकमतशी बोलताना डॉ. पाखमोडे म्हणाले, त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांकडून कळले की, खा. पटोले हे शनिवारी भिलाई येथे होते. रविवारी सकाळी पहाटे ते थेट साकोली येथील कार्यक्रमात पोहोचले. झोप नीट झाली नसावी व धावपळीमुळे प्रकृती अस्वस्थ झाली असावी. सध्या त्यांची प्रकृती सामान्य असलीतरी पुढील २४ तास डॉक्टरांची चमू त्यांच्याकडे लक्ष ठेवून असणार आहे. सर्व काही सामान्य असल्यास सोमवारी सकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात येईल, असेही ते म्हणाले. खा. पटोले यांच्या सोबत आ. परिणय फुके, सुनील कुंडे आदी उपस्थित होते.