शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएससी पर्यायी विषयांमध्ये पालीचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 21:19 IST

यूपीएससी परीक्षेतील पर्यायी विषयांमध्ये पाली वाङ्मयाचा समावेश करण्यासाठी प्रा. डॉ. बालचंद्र खांडेकर यांनी दुसऱ्यांदा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकार व यूपीएससी यांना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्टात पुन्हा याचिका : केंद्र सरकारला बजावली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यूपीएससी परीक्षेतील पर्यायी विषयांमध्ये पाली वाङ्मयाचा समावेश करण्यासाठी प्रा. डॉ. बालचंद्र खांडेकर यांनी दुसऱ्यांदा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकार व यूपीएससी यांना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला.याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. बी. एस. बासवान यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीने १६ आॅगस्ट २०१६ रोजी केंद्र सरकारला अहवाल सादर करून यूपीएससी परीक्षेतील पर्यायी विषयांमध्ये पाली वाङ्मयाचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. परंतु, केंद्र सरकारने त्यावर अद्याप सकारात्मक निर्णय घेतला नाही. अहवालानंतर झालेल्या यूपीएससी परीक्षांतील पर्यायी विषयांमध्ये पाली वाङ्मयाचा समावेश करण्यात आला नाही. केंद्र सरकार केवळ या अहवालावर विचार सुरू असल्याचे सांगत आहे. पाली प्राचीन भाषा असून त्यातून अनेक भाषांचा विकास झाला आहे. सर्व बुद्धकालीन वाङ्मय पाली भाषेत आहे. भारतीय इतिहास, प्रथा, परंपरा, संस्कृती व तत्त्वज्ञान सांगणारी पाली ही एक श्रीमंत भाषा आहे. बनारस हिंदू विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ व अन्य अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये पाली भाषा शिकविली जाते. त्यामुळे यूपीएससी परीक्षेतील पर्यायी विषयांमध्ये तत्काळ पाली वाङ्मयाचा समावेश करण्यात यावा, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. खांडेकर यांनी यापूर्वी याच विषयावर प्रथम जनहित याचिका व त्यानंतर अवमानना याचिका दाखल केली होती. परंतु, त्यांना हवा असलेला दिलासा अद्याप मिळाला नाही. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी बाजू मांडली.आठव्या शेड्यूलमध्येही नाही पाली भाषाराज्यघटनेतील आठव्या शेड्यूलमध्ये २२ भाषांना कार्यालयीन भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यात पाली भाषेचा समावेश नाही. डॉ. खांडेकर यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयामध्ये दुसरी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला यावरही तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. केंद्र सरकारने न्यायालयाला मौखिकरीत्या दिलेल्या माहितीनुसार, आठव्या शेड्यूलमध्ये पालीसह एकूण ३८ भाषांचा समावेश करण्याची मागणी होत आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयliteratureसाहित्य