शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
3
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
4
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
5
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
6
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
7
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
8
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
9
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
10
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
11
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
12
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
13
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
14
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
15
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
16
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
17
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
18
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
19
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
20
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क

पंजाबमध्ये दहशतवाद वाढीसाठी पाकिस्तानचे प्रयत्न

By admin | Updated: December 25, 2016 02:56 IST

पंजाब पुन्हा एकदा खालिस्तानी दहशतवाद्यांच्या तावडीत सापडावे यासाठी पाकिस्तान प्रयत्नरत आहे.

मणिंदरजितसिंग बिट्टा यांचा दावा : काँग्रेसमध्ये ‘वंदे मातरम्’चा जागर करणारे युवक नाहीत नागपूर : पंजाब पुन्हा एकदा खालिस्तानी दहशतवाद्यांच्या तावडीत सापडावे यासाठी पाकिस्तान प्रयत्नरत आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय पंजाब आणि काश्मिरातील कारागृहात बंदिस्त असलेल्या दहशतवाद्यांना सोडविण्याचे कारस्थान यासाठी रचीत असल्याचा खुलासा अ. भा. आतंकवाद विरोधी संघटनेचे संयोजक मणिंदरजितसिंग बिट्टा यांनी केला. मणिंदरजितसिंग बिट्टा यांनी शनिवारी लोकमत भवन येथे विशेष मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली. पंजाबमध्ये दहशतवाद वाढीसाठी पाकिस्तान अधिक प्रयत्नरत आहे. ही स्थिती पाहता सरकारने तात्काळ पंजाब आणि काश्मीर येथील कारागृहात बंद असलेल्या दहशवाद्यांना इतर राज्यातील सुरक्षित कारागृहात स्थानांतरित करणे आवश्यक आहे. या कारागृहाची सुरक्षा केंद्रीय राखीव सुरक्षा दलाकडे (सीआरपीएफ) सोपविण्याची सूचनाही बिट्टा यांनी यावेळी केली. पंजाबमधील ड्रग्सच्या (अमली पदार्थ) वाढत्या व्यवसायाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना बिट्टा म्हणाले, एकही राजकीय पक्ष यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी पुढे आला नाही. काँग्रेसपासून दूर होण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना बिट्टा म्हणाले, मी ‘राजकीय टेरेरिजम’चा बळी ठरलो आहे. प्रत्येक स्तरावर ‘पॉलिटेकिल टेरेरिजम’ (राजकीय दहशतवाद) वाढत आहे. मी सुरुवातीपासून पक्षाच्या सोबत राहिलो आहे. कधीही सत्तेची आणि पदाची लालसा बाळगली नाही, त्यामुळे राजकीय दहशतवादाचा बळी ठरलो. काँग्रेसमध्ये दशभक्तीने प्रेरित युवक नसल्याचा आरोप बिट्टा यांनी केला. ‘वंदे मातरम्’ आणि ‘ भारत माता की जय’ असा नारा देणाऱ्यांची संख्याही पक्षात वाढली नाही. कॉँग्रेसमध्ये आजही दिग्विजय सिंह, ए.के.अ‍ॅन्टोनी, गुलाम नबी आझाद सर्वेसर्वा आहेत. ‘वंदे मातरम्’चा जागर करणारे पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यासारख्या नेत्यांनी काँग्रेसला मजबूत केले. आपण पक्षासोबत नेहमी राहिलो आहे. काँग्रेसचा विरोधक नसल्याची स्पष्टोक्ती त्यांनी योवळी केली. (प्रतिनिधी) नोटाबंदीचा आयएसआय-दाऊदला फटका बिट्टा म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा भाजपाचा समर्थक अजिबात नाही. मात्र पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करतो. नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम या दहशतवादी ताकदींना बसला आहे. सरकारच्या या निर्णयामुळेच काश्मीर आणि पंजाबमध्ये दहशवादी कारवाया वाढविण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. यावर बिट्टा म्हणाले, ‘पाक तेरा ख्वाब एक नजारा ही रहेगा तू किस्मत का मारा है मारा ही रहेगा तेरे हर हमले का जबाव हम देंगे कश्मीर हमारा है हमारा ही रहेगा ’ आयुष्य बोनसमध्ये मिळाले मला आयुष्य बोनसमध्ये मिळालेले आहे. आजही राजकारणापासून दूर आहे. खानपानावरील नियंत्रण हे आपल्या तरुण दिसण्यामागचे रहस्य असल्याचे बिट्टा यांनी एका प्रश्नाचा उत्तरात सांगितले. आपले शरीर देशासाठी सत्कारणी लागावे अशी नेहमीच इच्छा राहिली आहे. यासाठी मृत्यूनंतर देहदानाचा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले.