शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी हेर निशांत अग्रवाल नागपूर कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:07 IST

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसह अमेरिकन गुप्तचर संस्थांना ब्रह्मोस क्षेपणास्त्र तसेच भारतीय सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती पुरविणाऱ्या निशांत अग्रवाल नामक हेराला लखनौ (उत्तर प्रदेश) एटीएसने गुरुवारी रात्री येथील नागपूर कारागृहात आणले. ८ ऑक्टोबरला भल्या पहाटे निशांतला उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि मिलिटरी इंटेलिजन्सच्या (एमआय)च्या पथकाने अटक केली होती. तो गेल्या सहा महिन्यापासून भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या चौकशीचा सामना करीत होता.

ठळक मुद्देयूपी एटीस, एमआयने केली होती अटक : सहा महिन्याच्या चौकशीनंतर परत आणले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसह अमेरिकन गुप्तचर संस्थांना ब्रह्मोस क्षेपणास्त्र तसेच भारतीय सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती पुरविणाऱ्या निशांत अग्रवाल नामक हेराला लखनौ (उत्तर प्रदेश) एटीएसने गुरुवारी रात्री येथील नागपूर कारागृहात आणले. ८ ऑक्टोबरला भल्या पहाटे निशांतला उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि मिलिटरी इंटेलिजन्सच्या (एमआय)च्या पथकाने अटक केली होती. तो गेल्या सहा महिन्यापासून भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या चौकशीचा सामना करीत होता.नागपूरजवळच्या मोहगाव (डोंगरगाव) येथील डीआरडीओच्या ब्रह्मोस एअरोस्पेस प्लांट विभागात सिनियर सिस्टीम इंजिनिअर म्हणून चार वर्षांपासून निशांत अग्रवाल नोकरी करीत होता. सोनेगाव पोलीस ठाण्याजवळ असलेल्या उज्ज्वलनगरात मनोहर काळे यांच्या घरी तो पत्नीसह भाड्याने राहात होता. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने त्याला आपल्या जाळ्यात ओढले होते. अत्यंत संवेदनशील आणि भारतीय सुरक्षेला छेदणारी माहिती तो पाकिस्तान तसेच अमेरिकन गुप्तचर संस्थांना फेसबुक तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरवित होता. कराची, लाहोर आणि इस्लामाबादमध्ये बसलेले पाकिस्तानी हस्तक त्याच्याशी वारंवार ऑनलाईन संपर्कात असल्याचे मिलिटरी इंटेलिजन्सच्या लक्षात आल्याने त्याच्यावर तसेच कानपुरातील त्याच्या एका महिला मित्रावर नजर ठेवण्यात आली. या दोघांचे पाकिस्तानमधील हस्तकांसोबतचे कोड ट्रॅक केल्यानंतर यूपी एटीएस आणि एमआयने ८ ऑक्टोबरला भल्या पहाटे नागपुरात धडक दिली. निशांत काम करीत असलेल्या ब्रह्मोस एअरोस्पेस प्लांट तसेच त्याच्या निवासस्थानी छापा घातला होता. निशांतला अटक करून लखनौला नेण्यात आले होते. त्याच्याकडून लॅपटॉप, टॅब आणि मोबाईलसह काही पेनड्राईव्हही जप्त करण्यात आले होते.पाकिस्तानी हेर नागपुरात पकडण्यात आल्याने देशभर खळबळ उडाली होती. तेव्हापासून निशांत काही दिवस उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि मिलिटरी इंटेलिजन्सच्या (एमआय) अधिकाऱ्यांच्या कस्टडीत होता. भारतीय सुरक्षा यंत्रणांमधील वेगवेगळ्या तपास पथकांनी त्याची चौकशी केली. अचानक त्याला गुरुवारी १४ मार्चला सायंकाळी यूपी एटीएसने प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत नागपुरात आणले. त्याला येथील मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. निशांतला मध्यवर्ती कारागृहाच्या विशेष सुरक्षा विभागात ठेवण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :ISIआयएसआयPrisonतुरुंग