शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

घरांना रंग चढवणारे पेन्टर्स झाले बेरंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 19:24 IST

कोरोनाच्या संसगार्पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी झालेले लॉकडाऊन काही अपवाद वगळता नागरिक पाळतही आहेत. या लॉकडाऊनचा परिणाम अनेकांच्या कामांवर झाला असून, रोज कमावेल तर रोज खाईल अशी अवस्था असणाऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा मार रोजगारावर, कुटूंबावर उपासमारीचे ओझेवर्षभर तरी काम मिळण्याची शक्यता नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संसगार्पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी झालेले लॉकडाऊन काही अपवाद वगळता नागरिक पाळतही आहेत. या लॉकडाऊनचा परिणाम अनेकांच्या कामांवर झाला असून, रोज कमावेल तर रोज खाईल अशी अवस्था असणाऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. विशेष म्हणजे, मध्यमवर्गावर हा मार जास्त पडत असल्याचे दिसून येते. हा वर्ग अतिशय स्वाभिमानी असल्याने स्थिती दयनीय आहे. घरादारांना रंगसाज चढवून चकचकीत करणारे पेन्टर्स मध्यमवर्गातच मोडतात. लॉकडाऊनमुळे किमान वर्षभर तरी ते बेरंग राहण्याची भिती निर्माण झाली आहे.साधारणत: जानेवारी ते जून हा काळ पेण्टर्ससाठी अतिशय अनुकूल असतो. या काळात नविन बांधकामे झालेली असतात तर जुन्याच घरांवर नवीन रंगरंगोटी करण्यासाठी नागरिक उत्सुक असतात. मात्र, चिनपासून सुरू झालेला कोरोना महामारीचा प्रसार भारतातही झाला आणि मार्च पासून संपूर्ण भारत लॉकडाऊनमध्ये गेला. इतर रोजगारांप्रमाणे पेन्टर्सही घरीच बसून राहिले. आॅर्डरप्रमाणे काम करावे आणि आपला पैसा घरी न्यावा, अशी दैनंदिनी असलेल्या या वर्गावर आता उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. महिनाभरापासून हाताला काम नाही म्हणून पैसाही नाही. असे जवळपास २५ हजार पेण्टर्स शहरात पुढे येणाºया संकटाशी झुंज देत आहेत. सध्या लॉकडाऊन सुरू आहे आणि कधी उठेल याचा नेम नाही. लॉकडाऊन उठल्यावरही जिवनमान सुरळित होण्यास बराच वेळ जाणार आहे. त्यातच पावसाळ्यात पेण्टिंग्जची कामे नसतात. दिवाळीत कामे निघत असली तरी यंदा उन्हाळ्याची तुट भरून काढण्यासाठीच नागरिकांचा प्रथम कल असेल. अशा स्थितीत पेण्टरवर्ग दयनिय अवस्थेत जाण्याची शक्यता आहे. वर्षभर तरी पेण्टर्स वर्ग विनारोजगार असण्याची भिती निर्माण झाली आहे.पालकमंत्र्यांकडे दिले निवेदनपेण्टर्सच्या असंघटित कामगार संघटनेचे संयोजक रमेश नागदवणे यांनी ही दयनिय अवस्था नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. आम्ही परीश्रमी आहोत आणि कुणापुढे कधी हात पसरवत नाही. मात्र, शासनाने साथ दिली नाही तर भिक मागण्याची वेळ आमच्यावर येणार आहे. गरीबांना शासन व इतर संघटना मदत पोहोचवत आहेत. मात्र, आमचे घर स्लॅबचे असल्याने आम्ही सधन असल्याचा भ्रम होतो. आम्ही सधन नसलो तरी थोडीफार प्रतिष्ठा आहे. तेव्हा पालकमंत्र्यांनी शासकीय योजनेतून प्रत्येक पेण्टर्सला या काळात दोन ते अडिच हजार रुपयाची मदत करावी, अशी मागणी रमेश नागदवणे यांच्यासह राजेश नागदवणे, सुरेश नागदवणे, शेखर डोंगरे, महिपाल ढवळे, दिनेश वर्मा, अनिल नंदेश्वर, बंटी हिरेखण, सुनिल वानखेडे यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस