शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाडवा भोवला; १०० हून अधिक बसेस उभ्या: कंडक्टर व चालकांची सामूहिक दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:07 IST

पोळ्याच्या पाडव्यामुळे महापालिकेच्या आपली बसच्या कंडक्टर व चालकांनी शनिवारी सामूहिक रजा घेतल्याने १०० हून अधिक बसेस डेपोत उभ्या होत्या.

ठळक मुद्देआपली बसला लाखोंचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोळ्याच्या पाडव्यामुळे महापालिकेच्या आपली बसच्या कंडक्टर व चालकांनी शनिवारी सामूहिक रजा घेतल्याने १०० हून अधिक बसेस डेपोत उभ्या होत्या. शहरातील अनेक मार्गावरील बसफेऱ्या बंद होत्या. यामुळे महापालिकेला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.आपली बसच्या ताफ्यात ३३७ मोठ्या रेड बसेस व ४२ मनी बसेस आहेत. परंतु यातील दररोज जवळपास ३६० बसेस धावतात तीन ऑपरेटरच्या माध्यमातून या बसेस चालविल्या जातात. बस कंडकटर व चालक उपलब्ध करण्याची जबाबदारी दिल्ली इंटिगे्रटेड मल्टी मॉडेल ट्रान्झिट सिस्टीम (डीआयएमटीएस) कंपनीकडे आहे. १५०० हून अधिक कंडक्टर व चालक आहेत. असे असतानाही शुक्रवारी कंडक्टर व चालक नसल्याने ४५ बसेस धावल्या नाही, तर शनिवारी जवळपास ११० बसेस उभ्या होत्या. यात मोठ्या बस सोबतच मिनी बसचाही समावेश होता. यामुळे सीताबर्डीहून पारडी, हिंगणा, गोधनी, बुटीबोरी, बहादुरा, डिफेन्स, वाडी व न्यू नरसाळा आदी ठिकाणी जाणाऱ्या बसेसची संख्या कमी होती. यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले.गेल्या दोन वर्षात कंडक्टर व चालक नसल्याने अचानक बसेस बंद राहिल्याने महापालिकेला जवळपास सात कोटींचा फटका बसल्याची माहिती सूत्रांनी दिली. वारंवार दांडी मारूनही संबंधित कंडक्टरवर कारवाई होत नाही. संबंधित कंत्राटदारालाही जाब विचारला जात नसल्याने हा प्रकार सुरू आहे. याला आळा घालण्याची गरज आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक