शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पद्मभूषण माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:55 IST

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंबाझरी घाट येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची कन्या डॉ. अरुणा पाटील यांनी अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले. 

ठळक मुद्देकन्या अरुणा पाटील यांंच्याहस्ते अंत्यविधी : गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंबाझरी घाट येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची कन्या डॉ. अरुणा पाटील यांनी अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले. 

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी महाराष्ट्र शासनाच्यावतीने पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पोलीस महासंचालकांच्यावतीने पुष्पचक्र अर्पण केले. सशस्त्र पोलीस दलाच्यावतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे पार्थिव राष्ट्रध्वजामध्ये ठेवण्यात आले होते. पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर राष्ट्रध्वज नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी पुत्र न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी, डॉ. अरुणा पाटील तसेच न्या. डी. एन. धर्माधिकारी, न्या. आर. के. देशपांडे, न्या. विकास शिरपूरकर (निवृत्त), उद्योगपती राहुल बजाज, डॉ. अभय बंग, श्रीमती राणी बंग, अशोक जैन तसेच त्यांचे सर्व नातवंडं व नातेवाईकांनी श्रद्धांजली अर्पण केली. 
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. यावेळी राज्यातून आलेल्या विविध मान्यवरांनी मौन श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कारासाठी गांधी संशोधन प्रतिष्ठान, सेवाग्राम आश्रम समिती, बजाज समूहाच्या विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, बजाज कुटुंबीय, न्यायमूर्ती जे. ए. हक, न्या. अतुल चांदूरकर, न्या. मनीष पिंपळे, न्या. रोहित देव, न्या. व्ही. एम. देशपांडे, न्या. मुरलीधर गिरडकर, न्या. विनय जोशी, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे प्रो. मनोज कुमार, कुलसचिव प्रो. के. के. सिंह. मा. म. गडकरी, गौतम बजाज तसेच सामाजिक, राजकीय विविध मान्यवर उपस्थित होते.सर्वोदय आश्रमात अंत्यदर्शनअंत्यसंस्कारापूर्वी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे पार्थिव सकाळी १० वाजतापासून अंत्यदर्शनासाठी बोले पेट्रोल पंपजवळील सर्वोदय आश्रमात ठेवण्यात आले होते. यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी येथे पोहचून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. याशिवाय राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेउन मौन श्रद्धांजली वाहिली. यामध्ये शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, उद्योजक राहुल बजाज, शेखर बजाज, राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नितीन राऊत, गिरीश गांधी, आमदार अनिल सोले, मनपाचे सत्तापक्ष नेता संदीप जोशी, अ‍ॅड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, अशोक धवड, रा.स्व. संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, महानगर कार्यवाह अरविंद कुकडे, शोभाताई फडणवीस, बाबुराव तिडके, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अखिल भारतीय सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव भाई, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी.एन.आर प्रभू, माजी अध्यक्ष जयवंत बापू मटकर, ज्येष्ठ गांधीवादी लीलाताई चितळे, रुपाताई कुळकर्णी-बोधी, हरिभाऊ केदार, सुरेश पांढरीपांडे, ज्येष्ठ गांधीवादी सुगंध बरंठ, जळगावचे भंवरलाल जैन, सर्वोदय आश्रमाच्या दमयंती पांढरीपांडे, ज्येष्ठ सर्वोदयी दत्तात्रय बर्गी, अशोक बर्गी, पौर्णिमा पाटील, वृषाली देशपांडे, प्रभाकर ढोक, वीणा बजाज, दिवाकर मोहनी, साधना कानिटकर, अधिवक्ता परिषदेचे अ‍ॅड. पारिजात पांडे, नरकेसरी प्रकाशनचे धनंजय बापट, अ.रा. देशपांडे, नितीन चौधरी, राजेश  कुंभलकर, संजय देशपांडे, हेमंत वाघ, आनंदवनचे सुधाकर कडू, माधव विठ्ठल कळीकर, डॉ. विजय टोळ, अ‍ॅड. मेहाडीया, अनिता धर्माधिकारी, एस.क्यू. जामा, जयप्रकाश गुप्ता, कवी राजेंद्र पटोरिया आदींनी अंत्यदर्शन घेत मौन श्रद्धांजली अर्पण केली.

 

टॅग्स :nagpurनागपूर