शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

नागपूरच्या मेगा मार्टमध्ये पॅकेटबंद बुरशीयुक्त शेंगदाणे जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:09 PM

अन्न व औषध प्रशासन विभागाकडे प्राप्त तक्रारीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी ल.प्र. सोयाम यांनी सक्करदरा येथील एअर प्लाझा रिटेल होल्डिंग प्रा.लि.ची (विशाल मेगा मार्ट) तपासणी करून पॅकेटबंद बुरशीयुक्त शेंगदाणे जप्त केले.

ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाकडे प्राप्त तक्रारीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी ल.प्र. सोयाम यांनी सक्करदरा येथील एअर प्लाझा रिटेल होल्डिंग प्रा.लि.ची (विशाल मेगा मार्ट) तपासणी करून पॅकेटबंद बुरशीयुक्त शेंगदाणे जप्त केले. हा अन्न नमुना विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.स्टोरमध्ये बुरशीयुक्त काजू व खराब शेंगदाण्याची विक्री करण्यात येत असल्याची तक्रार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य शाहीद शरीफ यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केली होती. त्या आधारे विभागाने कारवाई केली. तपासणीदरम्यान स्टोरमध्ये काजूचे पॅकेट उपलब्ध नव्हते. शरीफ यांनी सांगितले की, ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक संरक्षण कायदा अमलात आला. पण फूड बिझनेस ऑपरेटर या कायद्याचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. २६ जानेवारीला आकर्षक ऑफर देऊन ग्राहकांना असुरक्षित खाद्य पदार्थ विकण्यात येत असल्याचे प्रकरण पुढे आले. शरीफ यांनी स्वत: मेगा स्टोरमध्ये जाऊन पॅकबंद काजू आणि शेंगदाणे खरेदी केले होते. पॅकेटबंद दोन्ही खाद्यपदार्थांना बुरशी लागली होती.शरीफ म्हणाले, असुरक्षित खाद्य सामग्रीची विक्री करून मेगा स्टोर ग्राहकांना लुटत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष आहे. गेल्यावर्षी एफडीएच्या तपासणीत ३७ नमूने असुरक्षित आढळून आले होते. ७ प्रतिष्ठानांविरुद्ध फौजदारी खटले दाखल केले होते. नियमित तपासणी न करता अधिकारी मोठी घटना होण्याची वाट पाहात आहे का, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागnagpurनागपूर