शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची साठेबाजी : हायकोर्टात धक्कादायक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 00:53 IST

शहरातील खासगी रुग्णालये ऑक्सिजनची साठेबाजी करीत आहेत. त्यांच्याकडे ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे इतर रुग्णालयांना ऑक्सिजनची टंचाई निर्माण होऊ शकते, अशी धक्कादायक माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली.

ठळक मुद्देनिरीक्षण करण्याचे आदेश दिले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील खासगी रुग्णालये ऑक्सिजनची साठेबाजी करीत आहेत. त्यांच्याकडे ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे इतर रुग्णालयांना ऑक्सिजनची टंचाई निर्माण होऊ शकते, अशी धक्कादायक माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन अन्न व औषधी विभागाचे सहआयुक्तांना खासगी रुग्णालयांचे निरीक्षण करण्याचा आदेश दिला. तसेच, कोणतेही रुग्णालय ऑक्सिजनची साठेबाजी करणार नाही याची खात्री करून घेण्यास सांगितले. कोणत्याही रुग्णालयाला ऑक्सिजनची कमतरता भासू नये असे मतही न्यायालयाने व्यक्त केले.यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने वरील आदेश देतानाच कोरोना रुग्णांना खाटा व योग्य उपचार मिळायला हवा असे मत व्यक्त केले. तसेच, खासगी रुग्णालयांद्वारे आकारण्यात येत असलेल्या शुल्काच्या मुद्यावर पुढच्या तारखेला निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. यावेळी अन्न व औषधी विभागाचे सहआयुक्तांनी कोरोना रुग्णांना आवश्यक प्रमाणात जीवनरक्षक औषधे पुरविण्याची ग्वाही दिली. सध्या प्रत्येक मोठ्या रुग्णालयाला औषधांची दुकाने जुळलेली असतात. त्या दुकानांना आवश्यक जीवनरक्षक औषधे उपलब्ध करून दिल्या जातील. या औषधांचा कुणालाही तुटवडा भासणार नाही असेही त्यांनी सांगितले.सर्वांनी सहकार्याने कार्य करावेकोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविणे हा जनहिताचा विषय आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्याची भावना ठेवून कार्य करावे अशी अपेक्षा उच्च न्यायालयाने व्यक्त केली. कोरोनाशी संबंधित सर्व समस्या सहमतीने व कायद्यानुसार सोडवणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र मोठे आहे. त्यामुळे ते कोणताही आवश्यक आदेश देऊ शकते. उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाबत कुणीही भ्रमात राहू नये. सर्वांनी प्रामाणिकपणे कार्य करावे. न्यायालयात योग्य माहिती सादर करावी असेही न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या