शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात ‘अ‍ॅम्ब्युलन्स’मधील ‘ऑक्सिजन सिलेंडर’ ठरला जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:21 IST

साधारणत: रुग्णवाहिकेमधून जाणाऱ्या रुग्णांसाठी प्राणवायू अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. मात्र प्राणवायू साठवून ठेवणारे ‘ऑक्सिजन सिलेंडर’ उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णासाठी प्राणघातक ठरले. संविधान चौकात रुग्णवाहिकेतील एका रुग्णाच्या डोक्यावर ‘सिलेंडर’ पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देरुग्णाच्या डोक्याला लागले ‘सिलेंडर’ : उपचारादरम्यान मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: रुग्णवाहिकेमधून जाणाऱ्या रुग्णांसाठी प्राणवायू अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. मात्र प्राणवायू साठवून ठेवणारे ‘ऑक्सिजन सिलेंडर’ उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णासाठी प्राणघातक ठरले. संविधान चौकात रुग्णवाहिकेतील एका रुग्णाच्या डोक्यावर ‘सिलेंडर’ पडल्याने त्याचा मृत्यू झाला. धम्मदीपनगर येथील अजय चंद्रभान वानखेडे (५०) असे मृताचे नाव असून त्याच्या मृत्यूमुळे नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.पेंटिंगचे काम करणाऱ्या वानखेडे यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खराब होती. तोंडात फोड झाल्यामुळे त्यांना ११ एप्रिल रोजी सीताबर्डी येथील म्यूर मेमोरियल इस्पितळात दाखल करण्यात आले होते. १३ एप्रिल रोजी प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना वैद्यकीय तज्ज्ञांनी मेयो इस्पितळात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांचे नातेवाईक त्यांना सकाळी ११.१५ वाजता मेयोकडे नेत होते. रुग्णवाहिकेत अजय यांच्यासमवेत त्यांची पत्नी, मुलगा व दोन नातेवाईक होते. अजय यांना ‘सिलेंडर’च्या माध्यमातून प्राणवायू देण्यात येत होता. हे ‘सिलेंडर’ नातेवाईकाने पकडले होते तर आणखी एक ‘सिलेंडर’ स्ट्रेचरजवळ ठेवण्यात आले होते. संविधान चौक येथे अचानक ऑटो समोर आल्याने रुग्णवाहिकेच्या चालकाने ब्रेक लावला. त्यामुळे स्ट्रेचरजवळ ठेवलेले ‘सिलेंडर’ अजय यांच्या डोक्याला लागले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम झाली. याशिवाय त्यांच्या नातेवाईकांनादेखील जखम झाली. दोघांनाही मेयोमध्ये दाखल करण्यात आले. अजय यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सीताबर्डी पोलिसांनी आकस्मित मृत्यूचे प्रकरण दाखल करून चौकशीला सुरुवात केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCylinderगॅस सिलेंडर